आनंदाची बातमी! कॉग्निझंट मध्ये २००० पदांची मोठी भरती सुरु, येथून करा अर्ज..! -Cognizant Technology Solutions India Ltd Vacancy
Cognizant Technology Solutions India Vacancy
कॉग्निझंट हि IT क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. या ठिकाणी नोकरी मिल्ने हे अनेक फ्रेशर्सचे स्वप्न आहे. या नवीन भरती जाहिराती द्वारे आपले हे स्वप्न पूर्ण होऊ शकत!! माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी कॉग्निझंट २०२५ मध्ये २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहे. मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय (AI) प्रणित सॉफ्टवेअर विकासाची तयारी करण्यासाठी आपल्या टॅलेंट पिरॅमिडचा विस्तार करणं हे या भरतीचं उद्दीष्ट आहे. “आम्हाला मोठ्या प्रमाणात मॅनेज्ड सर्व्हिसेसचं काम मिळत आहे. त्यामुळे २०,००० फ्रेशर्स आता आमच्या पिरॅमिडला आकार देतील. या निमित्तानं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात होईल,” असं वक्तव्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार एस. यांनी मार्च तिमाहीच्या निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत केलं. ऑर्गेनिक ग्रोथ आता परत आली आहे. त्यामुळे पाया रचण्याची ही उत्तम वेळ आहे, असं कुमार म्हणाले. चला तर या रिक्रुटमेंट ड्राइव्ह बद्दल पूर्ण माहिती बघूया..!
या भरतीची माहिती अशा वेळी समोर आली जेव्हा कॉग्निझंटच्या भारतीय सहकाऱ्यांनी मागणीच्या वातावरणातील अनिश्चिततेचं कारण देत आर्थिक वर्ष २०२६ साठी नेमकी किती भरती होणार याची माहिती देणं टाळलं होतं. असं असलं तरी टॉप पाच आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात ८०,००० ते ८४,००० नोकऱ्यांची भर घालतील, असा अंदाज व्यवस्थापनाने व्यक्त केला जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणं वास्तविक आकडा मोठ्या प्रमाणात बदलूही शकतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवीन भरती झालेल्यांना फ्लोसोर्स (FlowSource) या कॉग्निझंटच्या अंतर्गत डेव्हलपर टूलवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे टूल जाईल जे मशीन-जनरेटेड कोड आणि मानवी कोडला एकत्र करतं. कॉग्निझंट आपल्या पॉवर प्रोग्रामर आणि फुल-स्टॅक डेव्हलपर भूमिकेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधून विशेष भरती सुरू ठेवणार आहे.
कॉग्निझंटमध्ये चौथ्या तिमाहीच्या अखेरीस १,२०० च्या तुलनेत सुमारे १,४०० प्रारंभिक GenAI एंगेजमेंट्स आहेत. एआयचा विकास तीन वेगवेगळ्या व्हेक्टरमध्ये केला जात आहे. नजीकच्या काळात, व्हेक्टर १ एआय-प्रणित उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करतं जेणेकरून उद्योजकांना त्यांच्या बॅलन्सशीटवरील अंदाजे २ ट्रिलियन डॉलर्सच्या तांत्रिक कर्जाचं निराकरण करण्याची संधी मिळेल. पहिल्या तिमाहीत, एआयद्वारे करण्यात आलेल्या कोडमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे आणि कंपनीच्या डेव्हलपर्ससाठी महत्त्वाची संधी आहे, असं एआयबाबत बोलताना कुमार म्हणाले.