खुशखबर! महापालिकेत होणार पाचशे कर्मचाऱ्यांची मार्च मध्ये भरती!! | CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

CMYKPY SMKM Online Application 2025

CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

 

महापालिकेची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण केली जाईल पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर” भरती प्रक्रिया राबवली जाईल. रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली. जनसुराज्य पक्षाचे समित कदम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, एमआयएमचे डॉ. महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गॅनिएल तिवडे आदींच्या शिष्टमंडळाकडून पदोन्नतींबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चवेळी भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केला. पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सुमारे साडेचारशे ते पाचशे जागा रिक्त होतील. या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवीन भरतीमुळे प्रशासन आणखी गतिमान होईल, असे मतही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तीन शहरांची महापालिका १९९८ मध्ये स्थापन झाली. त्यावेळी सांगली नगरपालिकेतील १ हजार ५५४, मिरज नगरपालिकेतील ४५२, कुपवाड नगरपालिकेतीत १५६ कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश झाला. सध्या महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची २ हजार ४०६ पदे मंजूर आहेत. त्यातील आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती; परंतु त्यानंतर तांत्रिक कारणातून ही भरती प्रक्रिया रखडली. रिक्त पदांच्या भरतीचा विषय अनेकदा चर्चेत आला. मात्र, पदोन्नतीच्या नावाखाली ही प्रक्रिया रखडत गेली.

 

महापालिकेत २००४ पासून भरती प्रक्रियाच राबवण्यात आली नाही. सध्याच्या प्रशासकीय काळात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने हा मुद्दा पुढे आणण्यात आला, पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. महिना अखेरपर्यंत पदोन्नतीचे काम पूर्ण होणार आहे. सव्वादोनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

 


CMYKPY SMKM Bharti 2024: CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Clerk- Typist, six. Information and Public Relations Officer, Teacher / Teacher, Junior Engineer, Electrical Electrician, Assistant Mechanic (Motor Mechanical), Pump Operator (Pump Operator), Draftsman / Tracer, Surveyor (Surveyor), Laboratory Technician / Blood Bank Technician, Laboratory Assistant / Blood Bank Assistant, Ray Technician, Wallman, Horticulturist”. There are a total of 173 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for CMYKPY SMKM Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 22nd of August 2024. For more details about CMYKPY SMKM Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

CMYKPY सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत “लिपीक- टंकलेखक, सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी, शिक्षक / शिक्षिका, कनिष्ठ अभियंता, वीजतंत्री इलेक्ट्रीशियन, सहाय्यक यांत्रिकी (मोटर मेकॅनिकल), पंपचालक (पंप ऑपरेटर), आरेखक/ अनुरेखक, सर्वेक्षक (सर्वेअर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक /रक्तपेढी सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, व्हॉलमन, बागमाळी” पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे.

 

  • पदाचे नावलिपीक- टंकलेखक, सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी, शिक्षक / शिक्षिका, कनिष्ठ अभियंता, वीजतंत्री इलेक्ट्रीशियन, सहाय्यक यांत्रिकी (मोटर मेकॅनिकल), पंपचालक (पंप ऑपरेटर), आरेखक/ अनुरेखक, सर्वेक्षक (सर्वेअर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक /रक्तपेढी सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, व्हॉलमन, बागमाळी
  • पदसंख्या173 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  18 – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाणसांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

CMYKPY SMKM Vacancy 2024

CMYKPY SMKM Vacancy 2024

CMYKPY SMKM Bharti 2024

How To Apply For CMYKPY SMKM Recruitment 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For CMYKPY smkc.gov.in 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gyf4i
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/raTN2
✅ अधिकृत वेबसाईट
https://smkc.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड