अहमदनगर “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेसाठी येथून करा अर्ज, PDF उपलब्ध | CMYKPY Ahmednagar Registration 2024
CMYKPY Ahmednagar Registration 2024
CMYKPY Ahmednagar Online Application 2024
CMYKPY Ahmednagar Registration 2024: Today we are going to give you important information about Maharashtra Chief Minister Youth Kaushalya Programm Yojana which has been launched by Maharashtra Government to provide free skill training for the economic development of the unemployed youth of the state. Maharashtra Chief Minister Youth Work Training Scheme will benefit all the youth of the state who are unemployed and whose financial condition is not good. Here Ahmednagar District is inviting application from candidates. Students can apply For CMYKPY Ahmednagar Registration 2024. We have given you all details about how to apply for CMYKPY Ahmednagar Bharti 2024.
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रम योजनेची महत्वाची माहिती देणार आहोत जी राज्यातील बेरोजगार तरुणांच्या आर्थिक विकासासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार असलेल्या आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा सर्व तरुणांना होणार आहे. अहमदनगर जिल्हा येथे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विद्यार्थी CMYKPY अहमदनगर नोंदणी 2024 साठी अर्ज करू शकतात. आम्ही तुम्हाला CMYKPY अहमदनगर भरती 2024 साठी अर्ज कसा करावा याबद्दल सर्व तपशील दिले आहेत..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उदिष्ट :– उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः-
> उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
योजनेचे ठळक वैशिष्टे-:
>बारावी, आय. टी. आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार महास्वयम (https://rojgar.mahaswayam.gov.in/) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
>विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील.
>सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
>सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
>सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana Ahmednagar
आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता
आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
>आस्थापना / उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर (https://rojgar.mahaswayam.gov.in/) नोंदणी केलेली असावी.
>आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
>आस्थापना / उद्योगामध्ये किमान २० मनुष्यबळ कार्यरत असावे.
>आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
उमेदवारांची पात्रताः
> उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
>उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर / पदव्युत्तर असावी.
>उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
>उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
>उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे
>उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व (https://rojgar.mahaswayam.gov.in/) नोंदणी केलेली असावी. नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर
शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.
अ.क्र | शैक्षणिक अर्हता | प्रतिमाह विद्यावेतन |
1 | १२ वी पास | ६०००/- |
2 | आय.टी.आय/ पदविका | ८०००/- |
3 | पदवीधर / पदव्युत्तर | १००००/- |
उमेदवार नोंदणी पध्दती – How To Register For Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana Ahmednagar Bharti 2024
»कोणत्याही ब्राऊजरचा वापर करुन गुगलमध्ये या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे. त्यानंतर (Job Seeker Find a Job) / नोकरी साधक (नोकरी शोधा) टॅब ओपन होईल. उजव्या बाजूला आपल्याला Jobseeker / CMYKPY Training Login दिसेल. आपली पुर्वीची नोंदणी असल्यास त्यामधे लॉगईन आयडी व पासवर्ड टाकून लॉगईन करावे व पुढील प्रत्येक टॅब मधील माहिती अपडेट करुन SAVE करावी.
»पुर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या नोंदणी” या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नविन नोकरी साधक (New Job Seeker) नोंदणी फॉर्म ओपन होईल.
»त्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्ड वरील माहितीशी सुसंगत माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. यात प्रथम नाव, वडीलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक, लिंग, आधार क्रमांक, मोबाईल नंबर इ. माहिती भरुन कॅप्चा कोड टाकावा व नेक्स्ट टॅबवर क्लिक करावे.
»आपण टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी संदेश येईल. तो टाकून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये आपणांस आईचे नाव, पत्ता, धर्म, जात, वैवाहिक स्थिती, उच्चतम शैक्षणिक पात्रता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करावा.
»त्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्या बाबतचा संदेश येईल. त्यामध्ये आपणांस नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.
»प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक / आधार कार्ड नंबर टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरुन आपण लॉगईन करावे व प्रोफाईल Edit Button click करून उर्वरित सर्व माहिती उदा. वैयक्तीक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव, तसेच बँक खाते तपशिल अपडेट करावा.
»सर्वात शेवटी आपणास डॉक्युमेंट अपलोड करावयाची आहेत. त्यामध्ये रहिवासी (Domicile) दाखला, शैक्षणिक डॉक्युमेंट व कॅन्सल चेक / पासबुक पेज (आधार लिन्क्ड बॅन्क खात्याचा) इ. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपली नोंदणी पुर्ण होते. अशा प्रकारे आपण उमेदवार नोंदणी करु शकता.
»ऑनलाईन नोंदणी करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण संबंधित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयास संपर्क साधावा.
How To Apply Online For CMYKPY Ahmednagar
Click Here To Apply For Ahmednagar CM Yuva Karya Prashikshan Yojana
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, आकाशवाणी समोर, सावेडी रोड, अहमदनगर या कार्यालयास दुरध्वनी क्र. ०२४१-२९९५७३५ किंवा योजना समन्वयक श्री. वसीमखान पठाण मो. नं. ९४०९५५५४६५. श्री. मच्छिंद्र उकिर्डे मो. नं. ९५९५७२२४२४, श्री. संतोष वाघ मो. नं. ८८३०२१३९७६, श्री. बद्रिनाथ आव्हाड मो. नं. ९४२०७२५२८०, श्री. योगेश झांजे मो. नं. ९५८८४०८८९० यांच्याशी संपर्क साधावा. उमेदवार सोबतचा QR code स्कॅन करुनही नोदणी करु शकतील.
उमेदवार – अर्ज करण्याची प्रक्रिया (313 KB)
उमेदवार – अर्ज नोंदणी प्रक्रिया (175 KB)
Table of Contents
Comments are closed.