CLAT 2020 : निकालाची तारीख, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

CLAT 2020 exam


CLAT 2020 Examination : CLAT 2020 exam  : विधी अभ्यासक्रमांच्या सीईटीनंतरचे प्रवेशाचे वेळापत्रक कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने जाहीर केले आहे.

CLAT Result 2020: कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने क्लॅट २०२० परीक्षा होण्याआधीच एक पोस्ट-एक्झाम कॅलेंडर जारी केले आहे. क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे. कन्सोर्टियमच्या निर्णयानुसार, निकालाच्या प्रक्रियेला कोणताही विलंब न करता तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा झाली की तत्काळ त्याच दिवशी आन्सर की म्हणजेच गुणतालिका जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड – १९ महामारीमुळे ही परीक्षा आधीच खूप वेळा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या गाईडलाइन्सनुसार, महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

ही उत्तरतालिका प्राथमिक स्वरुपाची असणार आहे. विद्यार्थ्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी २९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. हरकत पुरावा आणि शुल्कासह पाठवायच्या आहेत. जर हरकतींचा स्वीकार झाला तर ते उत्तर अंतिम उत्तरतालिकेच समाविष्ट करण्यात येईल. वेळापत्रकानुसार अंतिम उत्तरतालिका ३ ऑक्टोबर रोजी अपलोड केली जाणार आहे.

अंतिम निकाल ५ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादीसह जाहीर केला जाणार आहे. काउन्सेलिंग गुणवत्ता यादीनुसार होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्यांचे पसंतीक्रम यानुसार प्रवेश दिले जातील. काउन्सेलिंग प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल. उमेदवारांना काऊन्सेलिंग फी म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतील. यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला जाईल. हे शुल्क त्यांच्या युनिव्हर्सिटी फीमध्ये अॅडजस्ट केले जाईल.


CLAT 2020 Examination : कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक नोटिसा जारी केल्या आहेत.

CLAT 2020 exam guidelines: देशातील विविध राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये (NLU) प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेसाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. यामध्ये परीक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जर आपण सीएलएटी 2020 साठी अर्ज केला असेल तर परीक्षेपूर्वी या सूचना अवश्य जाणून घ्या.

जन्मतारखेच्या दुरुस्तीसाठी सूचना

पहिली सूचना अर्जातील जन्म तारखेच्या संबंधात आहे. त्यात नमूद केले आहे की अर्जात जन्मतारखेची सुधारणा करण्याची लिंक consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवार त्यात सुधारणा करू शकतात. यानंतर मात्र दुरुस्तीसाठी कोणतीही संधी मिळणार नाही.

कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने नमूद केले आहे की अर्जात दुरुस्त केलेली जन्मतारीख पुढील प्रक्रियेत अद्ययावत केली जाईल. मात्र, प्रवेश पत्रात नमूद केलेली तारीख तशीच राहील.

कोविड -१९ बाबत सूचना

कोविड -१९ साथीच्या काळात ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. कन्सोर्टियमच्या गाईडलाइन्सनुसार, ‘जे उमेदवार कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येईल, जे वैद्यकीय निरीक्षणाखाली असतील किंवा विलगीकरणात असतील, त्यांना क्लॅट २०२० मध्ये सहभागी होता येणार नाही.’

परीक्षेच्या दिवसासाठी इतर महत्वाच्या सूचना

२८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येतील. दोन तासांच्या परीक्षेमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी एकूण १५० प्रश्न तर पीजी कोर्ससाठी १२० प्रश्न विचारले जातील.

उमेदवारांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर पोहोचावे लागेल. परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश बंद होईल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही आणि उमेदवार परीक्षा देऊ शकणार नाहीत.

जर आपण रफ कागद वापरत असाल तर त्यावर आपला रोल नंबर लिहा आणि परीक्षेनंतर तिथे ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ठेवा.

परीक्षेत या गोष्टी जरूर घेऊन जा

  • – पारदर्शक पाण्याची बाटली – मास्क, ग्लोव्हज, हँड सॅनिटायझर ( ५० एमएल) – सेल्फ हेल्थ डिक्लरेशन – पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट (जर या श्रेणीनुसार अर्ज केला असेल तर)
  • – निळे किंवा काळे बॉलपेन
  • – अ‍ॅडमिट कार्ड
  • – वैध फोटो आयडी कार्ड

Consoetium of National Law Universities Postponed CLAT 2020 Exam : विधी अभ्यासक्रमांसाठी होणारी प्रवेश परीक्षा अर्थात CLAT 2020 आता ७ सप्टेंबरऐवजी २८ सप्टेंबरला होणार आहे.

CLAT 2020 Postponed: विधी अभ्यासक्रमांसाठी होणारी प्रवेश परीक्षा अर्थात CLAT 2020 पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा ७ सप्टेंबर रोजी होणार होती, मात्र आता ती २८ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येईल, असे कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कळवले आहे.

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही उमेदवारांनासाठी २८ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा होणार आहे. क्लॅट परीक्षेचे निमंत्रक प्रा. बलराज चौहान यांनी शुक्रवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. यात असे म्हटले आहे की ‘यूजी आणि पीजी अशा दोन्ही उमेदवारांसाठी ७ सप्टेंबर २०२० रोजी होणारी CLAT 2020 परीक्षा आता सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल.’ ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे.

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या कार्यकारी समितीची गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी बैठक झाली. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील करोना स्थिती अजूनही गंभीर असल्याने ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनेक राज्यातील लॉकडाऊन स्थितीची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. प. बंगालमधील लॉकडाऊन ७ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आला आहे. बिहारमधील लॉकडाऊनमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर क्लॅट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


CLAT 2020 Examination : CLAT 2020 Exam to be Held on September 7 : कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या सर्वसाधारण सभेत परीक्षेची तारीख ठरली…

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने सोमवारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT 2020) ची तारीख जाहीर केली. CLAT 2020 परीक्षा ७ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

CLAT 2020 Exam to be Held on September 7

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. त्यात कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेताना काय खबरदारीचे उपाय अवलंबता येतील त्यांचा आढावा घेण्यात आला आणि क्लॅटची तारीख ठरवण्यात आली. देशात विविध ठिकाणी असलेल्या लॉकडाऊन स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आरोग्य आणि सुरक्षिततेचे सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात येण्यावर एकमत झाले.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी क्लॅट परीक्षा ७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षा केंद्रांवर ती होईल.

कन्सोर्टियम परीक्षा केंद्रांची पाहणी करणार आहे. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा दिली जाईल. विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड हेच त्यांचे वाहतुकीचे परवाने समजले जावेत यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया कन्सोर्टियम पार पाडत आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. अॅडमिट कार्ड (हॉलतिकिट) विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांनंतर संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा. –  https://consortiumofnlus.ac.in/

CLAT 2020 Examination : कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २२ ऑगस्ट रोजी नियोजित होती…

CLAT 2020 Examination: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे. यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड – १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा कधी केली जाणार हे आयोजक संस्थेने नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे.

CLAT 2020 Examination

कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

CLAT 2020 परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते.

यंदा कोविड – १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहेत. कोविड-१९ संसर्गाची स्थिती सामान्य होत नसल्याने ही परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
  1. गणेश काळूराम मोरे says

    गणेश काळूराम मोरे म.पो.केम ता करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाॅब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड