खुशखबर! CISF मध्ये ७० हजार पदांच्या भरतीला गृह मंत्रालयाची मंजुरी!| CISF Bharti 2025
Central Industrial Security Force Recruitment 2025
Central Industrial Security Force Bharti 2025
CISF Bharti 2025 – Major recruitment is set to take place in the CISF in the coming days. According to information, approval has been given to increase the current strength of the Central Armed Police Force from 1.62 lakh personnel to the sanctioned limit of 2.20 lakh. So New CISF Bharti 2025 – 2026 will begin soon for huge bharti recruitment process. In a major and significant decision aimed at strengthening the Central Industrial Security Force (CISF) to support the country’s economic development, the Ministry of Home Affairs (MHA) has approved an increase in the CISF’s strength to 2.2 lakh. Under this plan, 70,000 personnel will be recruited by 2029. As per this new scheme, 14,000 personnel will be recruited annually into the CISF for the next five years under CISF Bharti 2025. The goal is to complete the recruitment of a total of 70,000 personnel by 2029. This decision will not only boost the force’s strength but also create significant employment opportunities for the youth.
CISF मध्ये येत्या काही दिवसात मोठी भरती होणार आहे. प्रताप माहिती नुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची सध्याची १ लाख ६२ हजार जवान संख्या वाढवून २ लाख २० हजार च्या मंजूर मर्यादेपर्यंत नेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक विकासाला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) अधिक बळकट करण्याच्या दिशेने केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, सीआयएसएफची संख्या २.२ लाखांपर्यंत वाढवली असून २०२९ पर्यंत ७०,००० कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या नव्या योजनेनुसार पुढील पाच वर्षांसाठी CISF मध्ये दरवर्षी १४,००० जवान भरती केले जातील. २०२९ पर्यंत एकूण ७०,००० जवानांची भरती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे केवळ दलाची ताकदच वाढणार नाही, तर तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारतातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, हवाई वाहतूक, बंदर, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, जम्मू-काश्मीरमधील कारागृह यांसारख्या क्षेत्रांमध्ये CISF चे मजबूत आणि कार्यक्षम पथक तैनात करणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये नक्षलवाद कमी झाल्याने, नवीन औद्योगिक केंद्रांच्या उभारणीची शक्यता आहे. या युनिट्सना व्यापक आणि प्रभावी सुरक्षा देण्यासाठी सीआयएसएफची मजबूत उपस्थिती आवश्यक असेल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. २०२४ मध्ये १३,२३० जवानांची भरती करण्यात आली असून, २०२५ मध्ये आणखी २४,०९८ जवानांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासोबतच महिला उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे, कारण CISF महिलांना अधिक संधी देण्याच्या दिशेने सकारात्मक धोरण राबवत आहे. या संख्यावाढीमुळे, सीआयएसएफला एक अतिरिक्त बटालियन उभारता येणार आहे, जी अंतर्गत सुरक्षा कर्तव्ये आणि आपत्कालीन तैनातीसाठी उपयुक्त ठरेल,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षभरात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये CISF च्या नव्या युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे:
- संसद भवन परिसर, नवी दिल्ली
- अयोध्या विमानतळ
- हजारीबाग येथील एनटीपीसी कोळसा खाण प्रकल्प
- पुण्यातील आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)
- बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्प
- एटा येथील जवाहर औष्णिक ऊर्जा प्रकल्प
- मंडी येथील बियास सतलज लिंक प्रकल्प
- याशिवाय, संसद भवन परिसर आणि जवाहर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात अग्निशमन दलाच्या दोन नवीन युनिट्सचीही स्थापना करण्यात आली आहे.
CISF Bharti 2025: Central Industrial Security Force is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Head Constable (General Duty)”. There are 403 vacant posts available. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned link before the last date. The last date for submission of applications is 6th June 2025. Online Registraion link will open from 18th May 2025. For more details about CISF Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)” पदाची 403 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
- पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
- पदसंख्या – 403 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 – 23 वर्षे
- अर्ज पद्धती –ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/
CISF Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) | 403 |
Educational Qualification For CISF Application 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) | Candidate should have completed 12th from any of the recognized boards or Universities. |
Salary Details For CISF Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) | Rs.25500-81100/- Per Month |
How To Apply For CISF Job 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cisf.gov.in Job 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/COp6A |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/W1gip |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.cisf.gov.in/ |
Table of Contents