CET सेलची घसरण! फक्त १३ कर्मचाऱ्यांवर १३ लाख विद्यार्थ्यांची जबाबदारी! – CET Cell Overburdened Badly!
CET Cell Overburdened Badly!
महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण भार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET सेल) या विभागावर आहे. मात्र या कक्षात कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता असल्यामुळे दरवर्षी १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत. या विभागात मंजूर ३० पदांपैकी केवळ १३ पदेच भरलेली असून, बाकीची सर्व पदे दशकभरापासून रिक्त आहेत.
२०१५ साली पारदर्शक आणि एकसंध प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी CET कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली. आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, कला अशा अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया CET सेलमार्फत पार पडते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ही जबाबदारी पार पाडणे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी रोजचीच तारेवरची कसरत ठरत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CET कक्षामध्ये सध्या आयुक्त आणि लेखापाल अशी दोनच पदे राज्य सरकारकडून थेट भरलेली आहेत. चार पदे प्रतिनियुक्तीवरून आलेली असून उर्वरित सात पदे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या अपुऱ्या मनुष्यबळावरच परीक्षा नोंदणी, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, ऑनलाईन परीक्षा आयोजन, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, तसेच महाविद्यालयांशी समन्वय यासारखी मोठी कामे दिली जात आहेत.
विशेष म्हणजे, परीक्षा समन्वयक व सहाय्यक परीक्षा समन्वयक ही महत्त्वाची पदेही रिक्त आहेत. एकूण १२ पैकी फक्त ४ पदेच सध्या कार्यरत असून, उर्वरित ८ पदे रिक्त आहेत. यामुळे परीक्षांचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
राज्य सरकारने इतर विभागांमधून कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्याचा प्रयत्न केला असला तरी, बहुतांश कर्मचाऱ्यांनी CET कक्षात काम करण्यास नकार दिला आहे. परिणामी हा विभाग अजूनच अडचणीत सापडला आहे. कामाचा ताण वाढत असून, मनुष्यबळ अजिबात पुरेसं नाही.
याशिवाय, प्रवेश प्रक्रिया अंतिम करण्याची जबाबदारी असलेल्या “प्रवेश नियामक प्राधिकरणा”तही अशीच स्थिती आहे. इथे मंजूर २२ पदांपैकी केवळ ६ पदे कार्यरत आहेत. त्यामुळे प्रवेश निश्चितीच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांनाही वेळेवर प्रवेश मिळत नाही.
या गंभीर परिस्थितीत, CET कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी वारंवार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. जर रिक्त पदे लवकर भरली गेली, तर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अधिक सुसंगत, वेळेवर आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.