अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्सच्या अभ्यासक्रमांसाठी विशेष केंद्र

Center for Animation, Visual Effects, Gaming and Comics Courses

Center for Animation, Visual Effects, Gaming and Comics Courses : अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) हे झपाट्याने विस्तारणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, या क्षेत्रासाठी केंद्र सरकार आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विशेष गुणवत्ता केंद्राची स्थापना करणार आहे. त्याअंतर्गत ‘एव्हीजीसी’चे अभ्यासक्रम शिकवले जातील, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री
प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली.

‘सीआयआय बिग पिक्चर समिट’मध्ये जावडेकर बोलत होते. ‘एव्हीजीसी’ क्षेत्राशी संबंधित उद्योग व स्टार्ट अपना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. ‘आपल्या देशातील संपर्क तंत्रज्ञानातील वृद्धी अभूतपूर्व आहे. त्यामुळे मनोरंजन आणि माध्यम उद्योगांमध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत. ‘एव्हीजीसी’ हे झपाट्याने विस्तारत असलेले क्षेत्र असून, यातील आपले तज्ज्ञ जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मदत करत आहेत. या तज्ज्ञांनी आपल्या स्वत:च्या चित्रपटांसाठी आत्तापेक्षा जास्त काम करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून भारतीय चित्रपटांमध्ये अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्सचा वापर अनेक पटींनी वाढेल,’ असे जावडेकर म्हणाले.

‘एव्हीजीसी’च्या विस्तारासाठी केंद्र सरकार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबईच्या सहकार्याने विशेष केंद्र स्थापन करणार आहे. इथे यासंबंधी अभ्यासक्रम शिकवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘इफ्फी’ला येण्याचे आवाहन जानेवारीमध्ये गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन जावडेकर यांनी या वेळी उपस्थितांना केले. तसेच, कान्सच्या ७५व्या वर्षानिमित्त २०२२च्या चित्रपट महोत्सवात भारत विशेष पॅव्हिलियन उभारणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली. या शिवाय पुढील वर्षी भारत ग्लोबल मीडिया अॅँड फिल्म समिटचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : म. टा,


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड