CBSE परीक्षा १ जुलै पासून होणार !

CBSE Exam From 1st July

सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे. या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलैदरम्यान पार पडतील. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. या परीक्षांच्या तारखेसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत होते.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या. यावेळी सीबीएसईने, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात येतील, असेही सांगितले होते.

तत्पूर्वी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वी १२ वीच्या एकूण ज्या ४१ विषयांच्या परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे घेता आल्या नाहीत, त्यापैकी २९ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा शक्य तेवढ्या लवकर घेतल्या जातील व पेपर तपासून निकाल जाहीर करण्याचे कामही सुरू केले जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यानंतर लॉकडाऊन वाढत असल्याने, राहिलेल्या विषयांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होऊ लागली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर माहिती देताना सूत्रांनी म्हटले होते, की ज्या विषयांच्या परीक्षा राहिल्या आहेत ते पुढील इयत्तेसाठी व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संबंधित विषयाची तयारी पक्की व्हावी व विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता निकालात प्रतिबिंबित व्हावी यासाठी त्या विषयांची परीक्षा घेण्याचे टाळणे योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख किमान तीन दिवस आधी कळविली जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड