CBSE: सीबीएसई बारावी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर
CBSE Board Exam 2020
CBSE Board Exam 2020 : CBSE Board class 12th practical exam 2021: कोविड – १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळांचे शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू झाले. बहुतांश शाळा आता बंद आहेत आणि वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये उर्वरित ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील विद्यार्थी-शिक्षकांसाठी कठीण जात आहे. याच दरम्यान बोर्डाने २०२१ मधील बोर्ड परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. परीक्षा निश्चितपणे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता सीबीएसईमार्फत बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरही (SOP) देखील तयार करण्यात आले आहे.
बोर्डाने सांगितलं आहे की बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. मात्र तारखांवर अद्याप अंतिम निर्णय होणं शिल्लक आहे. यानंतर प्रॅक्टिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रकाचे अंतिम नोटिफिकेशन जारी केले जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कशा होणार प्रॅक्टिकल परीक्षा?
बोर्डाने यासंबंधातील एसओपी तयार केले आहे. यानुसार, शाळांना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी बोर्डाद्वारे विविध तारखा पाठवण्यात येतील. त्या तारखांमध्ये शाळांनी या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. बोर्डाकडून एक पर्यवेक्षक शाळांमध्ये परीक्षांच्या वेळी उपस्थित असेल.
दरम्यान, २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या तर परीक्षा नियोजित वेळेतच होतील, असे बोर्डाने सांगितले आहे.
CBSE Board Exam 2020 : CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयीच्या सर्व शंकाकुशंकांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा आयोजित करणार आहे आणि लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.
लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. त्रिपाठी म्हणाले, ‘बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे.’
‘मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले. अॅप्स आले,’ असेही त्रिपाठी म्हणाले.
अंतिम तारखांचे स्वरुप स्पष्ट नाही
पुढील वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार हे नक्की असले तरी अद्याप अंतिम तारखा निश्चित झालेल्या नाहीत. परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबतची देखील कोणतीही माहिती वा घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवार आणि मार्च महिन्यात आयोजित केल्या जातात.
आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कोविड -१९ महामारी आणि त्यामुळे झालेलं चालू शैक्षणिक वर्षाचं नुकसान लक्षात घेऊन दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मे महिन्यापर्यंत पु्ढे ढकलल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे करोना महामारीमुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, काही शाळांनी तेही विलंबाने सुरू केले. दहावी, बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होण्याबाबतही समानता नाही. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. परिणामी या दोन राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
सोर्स : म. टा.
CBSE Board Exam 2020 : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन यावरून विद्यार्थी, पालक संभ्रमात होते. यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी स्पष्ट केले की बोर्डाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच लेखी होती. त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
लोकमत सोबत बोलताना भारद्वाज म्हणाले की ऑनलाईन परीक्षा स्पर्धा व अन्य प्रवेश परीक्षेपुरता मर्यादित आहे. पण बोर्डाची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. शिक्षणाच्या अनेक उद्देशापैकी एक उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य देखील महत्त्वाचे आहे. ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य जाणून घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. दुसरे आणखी कारण म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन परीक्षेसाठी इन्फ्रास्ट्रक्टर सुद्धा नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेचे आयोजन विद्यार्थी हिताय नाही. ते म्हणाले की विद्यार्थी कुठल्याही तणावात येऊ नये म्हणून अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. सीबीएसईच्या विषय तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या अनुरुप अभ्यासक्रमात कपात केली आहे. सीबीएसईच्या निर्णयानंतरच देशातील अन्य राज्यांनी अभ्यासक्रम कमी केला आहे.
– शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय नाही
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सीबीएसईने असे कुठलेही निर्देश शाळांना दिले नाही. भारद्वाज म्हणाले की ज्या राज्यांनी शाळांना परवानगी दिली आहे. तेथील पालकांनी शाळांचे निरीक्षण करावे. त्यानंतरच ठरवावे की मुलांना शाळेत पाठवायचे की नाही.
– ऑनलाईन शिक्षण काहींसाठी उपयुक्त
कोरोना संक्रमणामुळे काही शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी किती प्रभावी असल्याचे विचारले असता ते म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण काही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे पण काहींसाठी नाही. हे शिक्षण विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे, की ते किती गांभीर्याने अध्ययन करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता सारखी नसते.
सोर्स : लोकमत