कॅट परीक्षा 2020 चे अॅडमिट कार्ड आज होणार जारी

CAT Exam 2020

CAT Exam 2020 : इंडियन इ्न्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॅट २०२० परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. अधिकृत पोर्टलवर उपलब्ध वेळापत्रकानुसार बुधवारी म्हणजेच २८ ऑक्टोबरला कॅट प्रवेशपत्र देण्यात येईल. कॅट 2020 प्रवेश पत्र iimcat.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

कॅट परीक्षा २९ नोव्हेंबर २०२० रोजी तीन सत्रात घेण्यात येईल. सुमारे १५६ शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर कॅट परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची शहरे कॅट प्रवेश पत्रात दर्शविली जातील. आयआयएमला कोणतेही परीक्षा केंद्र / शहर बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे आणि / किंवा चाचणी वेळ व तारीख परिस्थितीनिहाय बदलण्याचा अधिकार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) ही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनाचे मूल्यांकन करून शॉर्टलिस्ट करण्यासाठी आयआयएमद्वारे घेण्यात येणारी मॅनेजमेंट अॅप्टीट्यूड टेस्ट आहे.

भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भारतातील व्यवस्थापन शिक्षण देणारी आघाडीची संस्था आहे. या संस्था स्थापन होऊन ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आज भारताच्या विविध भागात २० आयआयएम स्थापन करण्यात आल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॅट २०२० चे स्कोअरकार्ड कॅट वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येईल. उमेदवारांना एसएमएसद्वारे वैयक्तिकरित्या देखील माहिती दिली जाईल. कॅटचा निकाल जानेवारी २०२१ च्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. कॅट २०२० चा स्कोर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच वैध असेल आणि त्यानुसार वेबसाइटवर प्रवेशयोग्य असेल.


CAT Exam 2020 : CAT 2020: कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२० चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) २९ नोव्हेंबर २०२० रोजी कॅट परीक्षेचे आयोजन करणार आहे. देशातील २० IIM मधील MBA / PGDM अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

iimcat.ac.in या परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर शेड्युल देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर आहे. कॅट परीक्षेचे अॅडमिट कार्ड २८ ऑक्टोबरपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येईल.

वेळापत्रकानुसार कॅट परीक्षेचा निकाल जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. कॅट परीक्षेचे आयोजन कोविड -१९ महामारी लक्षात घेऊन त्यानुसार केलं जाईल. परीक्षेच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचना या केंद्र व राज्य सरकार आणि कॅट समूहाद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार बदलूही शकतात. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे – Important dates

  • नोंदणी सुरू होण्याची तारीख- ५ ऑगस्ट २०२० (सकाळी १० वाजता)
  • नोंदणीची अखेरची मुदत – १६ सप्टेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजता)
  • अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख- २८ ऑक्टोबर २०२०
  • कॅट परीक्षेची तारीख- २९ नोव्हेंबर २०२०
  • परीक्षेचा निकाल – जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड