CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर, देशातील तणावपूर्ण स्थितीमुळे निर्णय, नवीन वेळापत्रक.. – CA Exam Dates 2025

CA Exam Timetable 2025

CA Exam New Timetable 2025

देशातील परिस्थितीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात ९ ते १४ मे या तणावपूर्ण कालावधीत होणाऱ्या सीए अंतिम, इंटरमिजिएट, पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्स या परीक्षांचा समावेश आहे. आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.


आयसीएआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते १४ मे या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत गट-१ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, तर गट-२ मधील परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार होती. तसेच, अंतिम परीक्षेतील गट-१ मधील परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट-२ मधील परीक्षा ८, १० आणि २३ मे रोजी घेण्याचे नियोजन होते. परंतु, देशात उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची काळजी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर परीक्षा घेतल्या जातील. नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड