ब्रह्मोस एअरोस्पेस या कंपनीत अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर; अग्निवीरांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार | BrahMos Aerospace Bharti 2024
BrahMos Aerospace Bharti 2024
BrahMos Aerospace Bharti 2024
BrahMos Aerospace Bharti 2024: प्रायव्हेट कंपन्यांमध्येही आता अग्निवीरांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस या कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या काही विभागांमध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण ठेवले जाईल. टेक्निकल विभागात १५ टक्के आणि प्रशासकीय व सुरक्षा विभागात ५० टक्के जागा अग्निवीरांसाठी राखीव असतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अग्निवीरांसाठी एक चांगली बातमी आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायवेट लिमिटेड, भारत आणि रशियाच्या संयुक्त भागीदारीतील कंपनी, आता अग्निवीरांना नोकरीत आरक्षण देणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टेक्निकल विभागात १५ टक्के आणि प्रशासकीय व सुरक्षा विभागांमध्ये ५० टक्के आरक्षण असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विशेष म्हणजे, ब्रह्मोस एअरोस्पेस ही अग्निवीरांना आरक्षण देणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे. चार वर्ष सेवा दिलेल्या अग्निवीरांना या आरक्षणाचा फायदा घेता येईल.
किमान १५% जागा अग्निवीरांसाठी राखीव
ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीचे देशभरात अनेक केंद्रे आहेत, आणि तिथे सुरक्षा व प्रशासकीय कामांसाठी अग्निवीरांना ५०% संधी दिली जाणार आहे. त्याचबरोबर, थर्ड पार्टी कॉन्ट्रेक्ट स्टाफिंगच्या माध्यमातून किमान १५% जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी वचनबद्ध असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेसचे ध्येय नव्या पिढीला सशक्त करणे आहे.
अग्निवीरांना आरक्षण देणारी ब्रह्मोस एअरोस्पेस ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. याशिवाय, कंपनी २०० पेक्षा जास्त सहयोगी उद्योगांमध्येही अग्निवीरांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
ब्रह्मोस एअरोस्पेस ही भारत आणि रशियाची संयुक्त कंपनी आहे, जी सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या उत्पादनाचे काम करते. या मिसाईल्स पाणबुडी, जहाज, आणि विमानांमधून लाँच केल्या जातात. ब्रह्मोस मिसाईल २.८ मॅक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या तीन पट वेगाने चालते. १९९८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनीचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. भारताची या कंपनीत ७०% भागीदारी आहे, तर रशियाची ३०%.
या योजनेत १७ ते २१ वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात सामील करण्याची तरतूद
अग्निपथ योजना ही २०२२ च्या जून महिन्यात भारत सरकारने सुरू केली होती. या योजनेत १७ ते २१ वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात सामील करण्याची तरतूद आहे. यातील २५% अग्निवीरांना १५ वर्षांसाठी सैन्यात ठेवण्याची संधी मिळते. काँग्रेसने या योजनेचा विरोध केला आहे, कारण त्यानुसार ही योजना तरुणांना फक्त तात्पुरता रोजगार पुरवते.
BrahMos Aerospace Bharti 2022 Details
BrahMos Aerospace Bharti 2022: BrahMos Aerospace Private Limited is going to recruit interested and eligible candidates for the 24 vacancies to fill with the various posts. Eligible candidates apply before the Last Date. Further details are as follows:-
ब्रह्मोस एयरोस्पेस अंतर्गत “प्रणाली अभियंता“ पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव – प्रणाली अभियंता
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता –BE/B.Tech (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – नागपूर, हैदराबाद आणि पिलानी
- वयोमर्यादा – 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) ब्रह्मोस एरोस्पेस 16 करिअप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली 110010
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.brahmos.com
How to Apply For BrahMos Aerospace Vacancy 2022
- सदर पदांकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For BrahMos Aerospace Nagpur Jobs 2022
|
|
?PDF जाहिरात |
https://cutt.ly/WL8YdIq |
✅अधिकृत वेबसाईट |
www.brahmos.com |
✅हिंदी विज्ञापन |
https://cutt.ly/sL8Uzam |
Table of Contents
Sir माझ ITI मध्ये Refigiration & Air conditioning हा trade झाला आहे मी apply करु सकतो ❓