पालिकेमध्ये १६६ आशासेविकांसाठी भरती; २४ एप्रिलपर्यंत इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन | BMC Asha Sevika Bharti 2023

BMC Asha Sevika Bharti 2023

BMC Asha Sevika Bharti 2023

BMC Asha Sevika Bharti 2023: The Municipal Corporation has decided to appoint as many as 166 Asha health workers for the whole of Mumbai through the Department of Public Health on a contract and remuneration basis. For this, Mumbai Municipal Corporation has invited applications from interested candidates. Candidates who want to apply for BMC Asha Sevika Bharti 2023 must send their application before 24th April 2023.

आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत तब्बल ५ हजार ५७५ ‘आशा’ आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया संबंधित महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील आरोग्य केंद्रांमध्ये १ हजार ते १ हजार २०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे आशा सेविकेची नियुक्ती करण्यात येत आहे. एच पश्चिम विभागात १६६ आशा सेविकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज सादर करण्याकरिता २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Asha Swayamsevika Bharti 2023आशा सेविकांची विविध पदे भरण्याचा निर्णय झाला

मुंबई महापालिकेच्या आरोग्यविषयक कामकाजांसाठी राष्ट्रीय निकषांप्रमाणे सेविकांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत साधारण १ हजार ८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे आता आरोग्य  खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच नागरिकांमध्ये असलेले विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असेल.

BMC Asha Sevika Notification 2023

BMC Asha Sevika Bharti 2023

Age Limit Required For BMC Asha Sevika Application Form 2023

आशा स्वयंसेविका महिलांची वयोमर्यादा २५ ते ४५ वर्ष या दरम्यान असावी.

Education Required For BMC Asha Sevika Recruitment 2023

इच्छुक महिला उमेदवार साक्षर व किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण पूर्ण झालेले अपेक्षित आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे. आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱ्या अपेक्षित आहेत, जेणेकरुन त्यांना कामकाज सुलभतेने करता येईल.  या आशा सेविकांना दरमहा सहा हजार रूपयेपर्यंत कामावर आधारित मोबदला तत्त्वावर मानधन मिळणार आहे.

आशा सेविका पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज महापालिकेच्या ए’ ते ‘टी’ विभाग कार्यालयांमध्ये सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. २४ एप्रिल २०२३ हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. या कामावर आधारित मोबदला तत्वावरील कामासाठी पात्रता धारणा करणाऱया इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड