भूमि अभिलेख विभागात २५२८ पदे रिक्त,नवीन पदभरती २०२५ मध्ये…! | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025
Bhumi Abhilekh Vibhag Bharti Appointment Letter 2025
महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणार महत्वाचा विभाग म्हणजे “भूमी अभिलेख” , परंतु या भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २५२८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक १२४७ शिपायांची पदे भरली गेलेली नाही. जमिनीची मोजणी, मिळकतपत्रिका तयार करणे, रेकॉर्ड तयार करणे आदी कामे या विभागात होतात. मागील अनेक वर्षांपासून या विभागातील पदे भरण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक ई- फेरफार हे केवळ एक पद मंजूर आहे. तेही रिक्त ठेवण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखची १३ पदे रिक्त आहेत. मंजूर ४३ पैकी ३० जागा भरल्या आहेत. लेखा अधिकाऱ्याचे मंजूर असलेले एकमेव पदही भरण्यात आलेले नाही. या विभागाती अडीच हजार पेक्षा जास्त रिक्त पदे येत्या नवीन वर्षात सरकार तर्फे भरती अपेक्षित आहे. कारण या रिक्त पदांमुळे कामांचे नियोजन पूर्ण पाने विस्कळीत झाले आहे. याचा फटका कामाच्या दिरंगाईच्या रूपाने सामान्य माणसाला सोसावा लागत आहे. हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा विभाग आहे ज्यातून शासनाला चांगला महसूल मिळतो, आणि याचा विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या २०२५ मध्ये या विभाग पदभरती होईल अशी अपेक्षा आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन), विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख (गावठाण), कार्यालय अधीक्षक ही ४३१ पैकी तब्बल २० पदे रिक्त आहेत. सहायक लेखाधिकाऱ्यांची दोन पैकी केवळ एक जागा भरण्यात आली. उच्चश्रेणी लघुलेखक दोनपैकी एकच आहे. निम्नश्रेणी लघुलेखकांच्या नऊ पैकी चार जागा रिक्त आहेत. वाहन चालकांची ४८ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १६ कार्यरत आहेत. वरिष्ठ लिपिक ३५, परीक्षक भूमापक-निमतानदार ८१, कनिष्ठ लिपिक ९०८, नाईक ११४ आणि शिपायांची १२४७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मोजणीच्या केसेस ऑनलाइन दिल्या जातात. एका कर्मचायांकडे २० ते २५ केसेस येतात. महिन्यातील कामाचे सर्व दिवस काम करूनही या केसेस निकाली निघत नसल्याचे कर्मचायांकडून सांगितले जाते.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025: The recruitment process in Land Records Department is in the final stage, 1 thousand 250 land surveyors will join the service from the month of May. This will help to settle the pending land enumeration cases. The exams were also conducted in November last year. Its result was also announced. Now the documents will be scrutinized. The final list of eligible candidates will be announced after April 21. Accordingly, the eligible candidates will be given the appointment letter to be admitted to the Land Records Service on May 1.
शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर नव्याने होत नसलेली नियुक्ती तसेच नवीन भरती न होणे या समस्यांमुळे कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण पडत आहे. पाच कर्मचाऱ्यांपैकी दोघा-तिघांना अनेकवेळा शासकीय कामानिमित्त इतरत्र जावे लागते. तालुक्यातील आपापल्या कामांसाठी आलेले ग्रामस्थ कार्यालयात अपुरे कर्मचारी व कामास होत असलेला विलंब या कारणाने त्रस्त होत असुन त्याचे पर्यावसन वादावादीत होत आहे.
भूमापन कार्यालयातही आता मोजणी, पोट हिस्सा मोजणी, बिनशेती मोजणी तसेच मोजणी शुल्क हे गुगल पेद्वारे आकारण्यात येते. सध्याचे युग नईड भ्रमणध्वनी असले तरी बहुतांश नागरिक भ्रमणध्वनीचा वापर करीत नाही. शुल्क हे गुगल पे करावयास सांगण्यात आल्यावर भ्रमणध्वनीत गुगल पे सुविधा नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमधे वादावादी होताना दिसते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रोख रक्कम घेत शुल्क आकारावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत.
भूमिअभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, तसेच जमिनीच्या नोंदी, मोजणी याचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमिअभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. यातील १ हजार २५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.
निकाल जाहीर झाल्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्या यादीनुसार पात्र उमेदवारांना येत्या एक मे रोजी भूमिअभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तिपत्र दिले जाईल. त्यामुळे मेपासून पुण्यासह राज्यात १२५० भूकरमापक सेवेत रुजू होतील. परिणामी, मोजणीच्या प्रक्रियेला गती येईल.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी विभाग
New Update