होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या (B.H.M.S) प्रवेश प्रक्रियेसाठी कट-ऑफची मर्यादा कमी ; आता ३५ पर्सेटाईल | BHMS NEET Exam Marks Update
BHMS NEET Exam Marks Update
BHMS NEET Exam Marks Update
होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नीट परीक्षेतील पसेंटाइल कमी करण्याचा निर्णय राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने घेतल्यानंतर आयुष मंत्रालयानेही आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक गुणांची पात्रता १५ पर्सेटाइलने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तिसरी मुक्त फेरी रद्द करून नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
आयुष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत किमान ५० पर्सेटाइल मिळवणे आवश्यक असते. मात्र आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अभ्यासक्रमाच्या नियमित व मुक्त फेऱ्यांनंतरही अनेक राज्यांमध्ये जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे आयुष मंत्रालयाने तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता असलेल्या ५० पर्सेटाइलची मर्यादा ३५ पर्सेटाइल किंवा ११२ गुणांपर्यंत कमी केली आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा २५ पर्सेटाइल किंवा ८७ गुणांपर्यंत तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ३० पर्सेटाइल किंवा ९९ गुणांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पात्रता निकष शिथिल करण्यामुळे नीट परीक्षेत ३५ पर्सेटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची २२ नोव्हेंबर रोजी गुणवत्ता यादी, तसेच जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. २३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मुक्त फेरीमध्ये पसंतीक्रम भरले आहेत त्यांनाही पुन्हा पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. तिसऱ्या मुक्त फेरीसाठी २६ नोव्हेंबर रोजी निवड यादी जाहीर केली जाईल. निवड
झालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे
BHMS NEET Exam Marks Update: सध्या होमिओपॅथी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी पात्रता गुणांमध्ये काही बदल केले गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या (B.H.M.S) प्रवेश प्रक्रियेसाठी कट-ऑफची मर्यादा कमी करून 35 पर्सेंटाईल ठरवली आहे. यामुळे कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता होमिओपॅथी अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. होमिओपॅथी आणि इतर आयुष अभ्यासक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी पात्रतेची मर्यादा 40 पर्सेंटाईल असायची, परंतु आता ती 35 पर्सेंटाईलवर आणण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. …या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
होमिओपॅथी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेतील कमीत कमी गुणांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सर्वच प्रवर्गासाठी नीट आणि तत्सम प्रवेश परीक्षांमधील गुणांमध्ये तब्बल १५ पसेंटाईलची शिथिलता दिली असून, या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘होमिओपॅथी’साठी गुणमर्यादा होणार आता ३५ पर्सेटाईल
बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तरसाठी नीट आणि तत्सम परीक्षेत ५० पसेंटाईल गुण मिळविणे बंधनकारक होते. त्यातून ५० पर्सेटाईलपेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते. परिणामी या गुणांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर गुणांची अट १५ पसेंटाईलने कमी करण्यात आली असून, त्यामुळे ३५ पसेंटाईल असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. ही शिथिलता २०२४-२५ या वर्षासाठी देण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सोमवारी जारी केले. दरम्यान, आयोगाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवेशाची कट ऑफ डेट २० डिसेंबर करण्यात आली आहे.