तरुणांनो SMS गॅंग पासून सावधान
Beware of SMS Gang
Beware of SMS Gang – मित्रांनो, सध्या SMS टोळीच्या मेसेज अनेक युवकांना जाहिराती द्वारे आपल्या जाळ्यात ओढत आहेत. यात किमान दहावीपासून इंजिनिअरपर्यंतच्या नोकऱ्या आमच्याकडे उपलब्ध असे यात सांगितले जाते. तसेच शिक्षणाच्या पात्रतेपासून पगाराचे किती पॅकेज व कोणकोणत्या सुविधा अशी भूलविणारी माहिती घातली जाते. यातून शहराचे आकर्षण आणि रोजगाराची आशा यामुळे बेरोजगारांची यात फसगत होते.
अशी केली जाते फसगत…
– मेसेजवर केवळ आकर्षक पगार व सुविधा आणि संपर्क क्रमांक. यात कंपनीचे नाव किंवा वेबसाईट याचा उल्लेख नसतो
– गरजूकडून मेल ऐवजी व्हॉटस्ऍपवर कागदपत्रे मागवून घेणे
– दोन दिवसांनी नोकरी मिळाली आहे, मुलाखतीला या असा मेसेज पाठवणे
– मुलाखतीचे ठिकाण कंपनीऐवजी कोणतेतरी गाव किंवा तात्पुरते उभारलेले ऑफिस
– उमेदवाराकडून मुळ आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेणे
– पाच-सहा गरजू जमा झाल्यावर गाडीत घालून लांबून कंपनी दाखविली जाते
– कंपनीसोबत करारासाठी दहा ते बारा हजारांची मागणी. पैसे मिळाले की गणवेश, बुटासाठी पुन्हा मागणी
– नोकरी नको असे म्हणणाऱ्यांना मूळ कागदपत्रे देण्यासाठी पैसे घेतले जातात
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
– नोकरी आणि प्रत्यक्षातील नोकरी यात प्रचंड तफावत असते. मध्यम किंवा लघू कंपन्यांना साहित्य पुरविणारा हा छोटा उद्योग असतो. पोस्ट मॅनेजरची; मात्र हमालीची कामे लावली जातात. कोणताही करार केला जात नाही. दहा ते बारा तास काम करावे लागते. भोजन व निवास व्यवस्था म्हणजे निकृष्ट जेवण आणि एक साधी खोली असते. त्यामुळे एका महिन्यात हा जॉब सोडला जातो. आपण फसलो आहोत या भावनेमुळे कोणी पोलिसात तक्रार करत नाही.
ही घ्या काळजी…
– स्वत:ची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा आणि पगार किती मिळू शकतो यावर
स्वत:लाच अजमावा
– सोशल मीडियावर फिरणाऱ्या किंवा कर्णोपकर्णी समजणाऱ्या नोकरी संधी माहितीवर विश्वास ठेवू नका
– थेट कंपनीची वेबसाईट पहा, एचआर विभागाशी मेलव्दारे संपर्क साधा
– नोकरी कोणत्याही मध्यस्थीमार्फत मिळविण्याचा प्रयत्न करू नका, तसेच
त्यासाठी पैसे देवू नका
———————–
अधिकृत नोकरी अशी मिळते…
– कोणतीही कंपनी कामगार भरतीसाठी त्यांचे अधिकृत संकेतस्थळ किंवा कंत्राटी कामगार पुरवठादार किंवा कॅम्पस इंटरव्हू याचा वापर करते
– कंपनी आवारात प्रशासन विभागाकडून कागदपत्रे तपासणी, मुलाखत आणि कौशल्य चाचणी, शारिरिक तंदुरूस्ती घेतली जाते.
-कोणतीही पैशाची मागणी नसते.
he correct ahe. atach char divsanpurvi kotak mahendra bank ltd. ya bankmade job sathi pahila approval cha mail ala. 1850 bharayla sangitle. then interview call ala. tyamade document verification fees mhanun 4500 bharayla sangitle. ata appointment letter sathi 9960 bharayla sangitle aahet. approval letter he word file tyachyakadun chukun send jali asta letter vr watermark nasta to kotak bank ltd cha photo wrap karun words chya mage lavla ahe. he tya word file mule samjle.