राज्यातील बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश
Beware Bogus Army Bharti
Beware Bogus Army Bharti – सैन्यात भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या शाखेने पर्दाफाश केला आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे उजेडात आले नसले तरी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसली असल्याने यात कोणी बडा मासा गळाला लागणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष दोन वर्षांपासून आरोपी दाखवत होते. तर विश्वास बसावा म्हणून आरोपी भारतीय नौदलात (नेव्ही) नेमणुकीस नसताना सुद्धा नौदालाचा पोषाख परिधान करून भिगवण व लोणावळा येथे एकूण 3 लाख 80 हजार रूपये घेत त्यांना आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाचे बनावट ई मेलवरून नौदलाचे बनावट नियुक्ती पत्र, ऍडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा, विदर्भ, जिल्ह्यातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीच्या एजंटमार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी 2 ते 4 लाख याप्रमाणे कोट्यावधी रूपये घेऊन फसवणूक केल्याचे सांगितले.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
आरोपींनी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं. 020 – 25651353) येथे संपर्क साधावा. बेरोजगार तरूणांनी सैन्यदलात व इतर सरकारी नोकरीस लावतो या अमिषाला बळी न पडता स्वतःची फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भिगवण(ता. खेड) : सैन्यत भरतीच्या नावाखाली महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणारे पोलिसांचे पथक. इन्सेटमध्ये आरोपी आकाश डांगे, नितीन जाधव.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App