तर लोकांनाच शिक्षक भरती वरून विश्वासच उडून जाईल- सुप्रीम कोर्ट ! – Maharashtra Bengali School Bharti 2025
Bengali School Bharti 2025
Maharashtra Bengali School Bharti 2023 – पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात २५ हजार शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगालच्या सरकारला अनेक प्रश्न केले. पश्चिम बंगाल सरकारने शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नेमणूक केली,यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न अनेक प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगालच्या सरकारने वकील नीरज किशन कौल यांनी म्हटलं की, सीबीआयने २५ हजार शिक्षकांच्या नियुक्ती अवैध नसल्याचं काही म्हटलं नाही’.
पश्चिम बंगालच्या दुसऱ्या वकील जयदीप गुप्ता यांनी म्हटलं की, हायकोर्टाचा शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय हा निकाल चुकीचा आहे. हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रातील हा निर्णय नव्हता’. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, ‘भरतीशी निगडीत सर्व प्रती नष्ट करण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं काय झालं? असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर वकिलांनी आता त्या प्रती मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘भरतीचं आयोजन करणाऱ्या आयोगाने डिजिटल स्वरुपात तरी या पत्रिका तुमच्या जवळ ठेवायला पाहिजे होत्या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. या प्रकरणात अशी परिस्थिती असेल तर लोकांचा विश्वास उडेल’, असे सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटलं. तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यात २५ हजारांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशाला देखील स्थगिती दिली होती. हायकोर्टाचं म्हणणं होतं की, नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना वेतन देखील पुन्हा देण्यास सांगितलं होतं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून या शिक्षकांना दिलासा न मिळाल्यास त्यांना वेतन पुन्हा शासनाला द्यावे लागणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
The posts of shiksha sevaks in 46 Bengali medium primary schools in Gadchiroli Zilla Parishad have been lying vacant since 2009 and there has been a huge delay in filling up these posts. This is causing a huge loss to Bengali-speaking students and there is an urgent need to take a decision in this regard. “As a special case, we should fill up the vacant posts of primary school teachers in Bengali-speaking mediums through open category,” he said. Mla Dr. Devrao Holi (MLA Dr. Devrao Holi) has met the Secretary of the Education Department at Mantralaya, Mumbai.
गडचिरोली जिल्हा परिषदेतील 46 बंगाली माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवकांची पदे 2009 पासून रिक्त असून सदर पदे भरण्यासंदर्भात प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे बंगाली भाषिक विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत असून या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. करिता आपण विशेष बाब म्हणून बंगाली भाषिक माध्यमांचे प्राथमिक शाळेतील शिक्षक सेवकांची रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांनी शिक्षण विभागाचे सचिव यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन पत्राच्या माध्यमातून केली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने बंगाली माध्यम भाषिक अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे बंगाली आरक्षण लागू होत नाही. करिता बंगाली माध्यमांची शाळा प्रमाणे शिक्षक संख्या अद्यावत करून दिनांक 5 मार्च 2023 च्या जाहिरातीप्रमाणे रिक्त असलेल्या जागा भरण्याचे अधिकार आपणाकडे आहेत. सदर पदे भरण्यासंदर्भात तातडीने कारवाई करून बंगाली समाजावरील अन्याय दूर करावा, अशीही मागणी आमदार डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांनी यावेळी केली.
Bengali Medium Schools of Bengali medium are functioning in the district and the posts of Bengali medium teachers are sanctioned in them. But since the last many years, the students were suffering educational losses due to non-recruitment of teachers. Regarding this serious matter, MLA Dr. Devrao Holi as well as Chief Executive Officer of Zilla Parishad Kumar Ashirwad jointly followed up consistently at the government level. Finally, the government has taken notice of this and directed to fill the vacancies in Bengali medium schools. Due to this directive of the government, the issue of vacancies in Bangami medium school, which has been pending for the last 14 years, has been resolved.
Bengali Medium जिल्ह्यात बंगाली माध्यमांच्या शाळा कार्यान्वीत असून यामध्ये बंगाली माध्यम शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र मागील ब-याच वर्षापासून शिक्षकांची पदभरती न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही गंभीर बाबीसंदर्भात आमदार डॉ. देवराव होळी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासन स्तरावर संयुक्तरित्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने याची दखल घेत बंगाली माध्यम शाळेतील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहे. शासनाच्या या निर्देशामुळे मागील 14 वर्षापासून प्रलंबित असलेल्या बंगामी माध्यम शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जिल्ह्यात एकूण 46 बंगाली माध्यमांच्या Bengali Medium शाळा असून यात तब्बल 116 बंगाली माध्यम शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. मात्र मागील अनेक वर्षापासून पदभरती न झाल्याने बंगाली माध्यम शिक्षकांचे पदे रिक्त आहत. या शाळांवर इतर माध्यमांचे शिक्षक अध्यापन करु शकणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता बंगाली समाजाचे प्रतिनिधी, उमेदवार यांनी आ. देवराव होळी व प्रशासनास सदर शाळांतील रिक्त पदे भरण्यासबंधाने कार्यवाही करण्याची मागणी मागील 14 वर्षापासून लावून धरली होती. याअंतर्गत आ. होळी यांनी वेळोवेळी शासन स्तरावर मागणी करुन कार्यवाही संबंधाने शासनास निवेदन सादर केले. तसेच जिप मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांचेशी वस्तुस्थितीबाबत चर्चा करुन शासनाकडे पाठपुरावा करण्यास सुचना केली. यास सीईओ यांनी सकारात्मकता दर्शवित वळोवेळी शासन स्तरावर वेळोवेळी पत्र व्यवहार केला होता. अखेर आ. होळी व सीईओ यांच्या संयुक्त सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने बंगाली माध्यम शाळांतील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहे.
रिक्त पद भरतीची प्रक्रिया सुरु
Bengali Medium शासनाच्या निर्देशान्वये जिप सीईओ कुमार आशीर्वाद यांनी सर्व प्रशासकीय, तांत्रीक बाबी तपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार व शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांनी तातडीने प्रकरणात कार्यवाही करुन 5 मे 2023 ला जाहिरात प्रकाशित करीत अर्ज मागाविले. याअंतर्गत पद भरतीची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती जिप प्रशासनाने दिली आहे.