महत्वाचा बदल जाहीर, आता यापुढे बीएड-एमएडसाठी एकच ‘सीईटी’ राहणार,पूर्ण माहिती! – BEd MEd Common CET

BEd MEd Common CET – सध्या राज्यात शैक्षणिक पडतात अनेक महत्वाचं बदल सुरु आहे. त्यात एक नवीन बदल समोर आला आहे. राज्यात BEd, BPEd आणि BEd, Med या अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या स्वतंत्र सीईटी परीक्षा बंद करून एकच सामाईक सीईटी घेण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाचे (CET) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून हा निर्णय लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा प्रथमच दोन CET परीक्षा होत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार सीईटी सेलच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रित निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बीएड, बीपीएड आणि BEd-MEd (एकात्मिक) या तिन्ही पदवी अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेशपरीक्षा न घेता एकच परीक्षा घेतली जाणार आहे.

Home Guard Bharti 2026
एकाच परीक्षेच्या गुणाच्या आधारे तिन्ही ठिकाणी प्रवेश
सीईटी सेलने एकत्रित परीक्षा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. नवीन पद्धतीनुसार एकाच सीईटीच्या गुणांच्या आधारे तिन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकच परीक्षाच्या निर्णयामुळे २ विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेतून तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे प्रवेशप्रक्रिया अधिक सुलभआणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असेही आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड