B.Ed. अभ्यासक्रम आता पुन्हा 1 वर्षांचा होणारं! – BEd Admission 2024

BEd Course Online Teacher Training 2024

BEd Admission 2024

 

शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच बीएडचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत प्रस्तावित बदलामध्ये दहा वर्षांनंतर बीएड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे. बीएड महाविद्यालयांसाठी २०२५ पासून नवीन बदलांची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

 

यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे (एनसीटीई) अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक पात्रता चाचणीच्या नियम आणि निकषांमध्येदेखील बदल केले जाणार आहेत. हे बदल २०२७ मध्ये चार वर्षाच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील. याची अधिसूचना लवकरच जारी के ली जाईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक स्तर या चार भागांनुसार शिक्षक तयार केले जातील. पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बीएड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

 


BEd Admission 2024 – The BED course has been permanently discontinued. From the next academic session 2024-2025, only four-year special B.Ed courses will be approved. The Rehabilitation Council of India (RCI) has issued a notice in this regard. Special B.Ed courses are taught in various educational institutions across the country. These courses are approved by RCI. In its circular, RCI has made it clear that this new course will be implemented for about 1000 institutions and universities across the country.

 

BEd अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे 1000 संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेय. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (BEd Admission 2024) सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे. या परिपत्रकात NCTE ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) मध्ये चार वर्षांच्या B.Ed कार्यक्रमाची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही केवळ चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून आरसीआयकडून केवळ चार वर्षांच्या बीएड (विशेष शिक्षण) अभ्यासक्रमालाच मान्यता मिळणार आहे, असे म्हटले आहे.

काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम?

विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे. एनसीटीई विशेष बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरसीआय हा अभ्यासक्रम राबवणार आहे. एनसीटीईचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तयार केला जात आहे. या संदर्भात डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ, लखनौचे प्रवक्ते डॉ. यशवंत वीरोदय यांनी बीएड (विशेष शिक्षण) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या भवितव्याबाबतच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.


BEd Admission 2023  – The admission schedule for ‘Bachelor of Education’ (B Ed.) in the state has been announced. The merit list will be announced on August 7 and the first round admission list will be announced on August 19. B. Ed.’s admission process is currently going on and students have been extended three times for online registration for cap round. The admission schedule for cap round has been announced as per the deadline for online registration on 3rd August

 

राज्यातील ‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ (बी एड.) च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे सात ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून १९ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीतील प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे बी. एड.ची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून कॅप राउंडसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली आहेत त्यानुसार कॅप राउंडच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंडसाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. या नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर ५२ हजार ५२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी ४९ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत ४३ हजार ९०२ विद्यार्थ्यांचे व्हेरीफाय झाले आहेत.

 

कॅप राउंडसाठी 3 ऑगस्ट रोजी ३ वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यामध्ये ७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे पहिल्या फेरीचे प्रवेश २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत
तसेच २४ ऑगस्ट रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे २६ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयांवे वितरण करण्यात येणार आहे ३० ऑगस्टला तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती देण्यात येणार आहे १३ सप्टेंबर रोजी तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत

 


 BEd Course Online Teacher Training : The BEd course can be completed through regular or Open and Distance Learning (ODL). You can do short term online teacher training certificate courses through many websites. Further details are as follows:-

बीएड हा कोर्स रेग्युलर किंवा ओपन अॅण्ड डिस्टन्स लर्निंग (ओडीएल) माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो. अनेक वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही शॉर्ट टर्म ऑनलाईन टिचर ट्रेनिंग सर्टिफिकेट्स कोर्स करू शकता. आधी बीएड कोर्स एक वर्षाचा होता. जो आता दोन वर्षांचा करण्यात आला आहे. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम देखील सुरू आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Coursera, Udemy, Future learn या ऑनलाइन लर्निंग वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र देखील मिळेल.

  • Udemy: ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स गाइड (२ तास)
  • Coursera: लर्निंग टू टीच ऑनलाईन, टीचिंग कॅरक्टर अँड क्रिएटिंग पॉझिटिव्ह क्लासरूम (१ ते ३ महिने)
  • FutureLearn: इम्बेडिंग मेंटल हेल्थ इन करिकुलम (१२ आठवडे)
  • edX: लीडिंग एजुकेशनल इनोव्हेशन अँड इम्प्रूव्हमेंट (१० महिने)

Eligibility For BEd Admission

विद्यार्थ्यांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून बीए (बॅचलर ऑफ आर्ट्स) / बीकॉम (बॅचलर ऑफ कॉमर्स) / बीएससी (बॅचलर ऑफ सायन्स) किंवा इतर कोणती पदवी आवश्यक आहे. पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Anil says

    Kroas kelyavar pravet school madhe lakcheras gheta yevu shakatat ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड