‘बार्टी’ मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै बँक ५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देणार!! । BARTI Pune Recruitment 2025
BARTI Maharashtra Bharti 2025
BARTI Pune Bharti 2025
बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबै जिल्हा बँक ५ लाखांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी केली. मुंबै बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयात बार्टीद्वारे प्रशिक्षण घेऊन (आयआयटी) (एनआयटी) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबै बँकेचे शैक्षणिक कर्ज देण्यासाठी भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. दरेकर बोलत होते.
या समाजातील मुलांना शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदरात कर्ज कसे देता येईल, याबाबत शासन स्तरावर धोरण आणू, अशी ग्वाही देताना बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊ, तसा निर्णय आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेऊ, असा विश्वासही दरेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मुंबै बँक शिक्षणासाठी, शिक्षणाच्या कर्जासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. बार्टीला मुंबै बँकेकडून जेवढे सहकार्य लागेल तेवढे केले जाईल. विद्वत्ता म्हटले की समोर नाव बाबासाहेबांचे येते. केवळ बाबासाहेबांची लेकरं म्हणून चालणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे आदर्श घेतले तर आपण यशस्वी होऊ, असे सांगून दरेकर म्हणाले, माझ्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा वेगळा पगडा आहे. जेव्हा समाजाचा विषय येतो, त्यावेळी मी एक पाऊल पुढे टाकून मदतीसाठी सरसावतो. जे आमच्या हातात आहे ते आम्ही तत्काळ करू. सरकारची मदत लागेल त्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊ. मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला तर त्यांच्याकडेही बैठक घेऊ, असे दरेकर म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजातील मुले वेगवेगळ्या हुद्यावर नावलौकिक कमावत आहेत. या समाजातील मुलांनी पुन्हा बाबासाहेबांचे शक्तीस्थान असलेले ‘शिक्षण’ कमवावे आणि आपल्या कुटुंबाच्या भल्याबरोबर समाजाचे भले करावे, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Previous Updates
BARTI Maharashtra has invited applications for the interested and eligible candidates to fill the posts. Eligible candidates apply before the last date. More details are as follows:-
The recruitment notification has been declared from the respective department for the posts of “Students”. There are a total of 150 vacancies to fill with the posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants need to apply online mode for BARTI Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 05th of January 2024. For more details about BARTI Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत “विद्यार्थी” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विद्यार्थी
- पदसंख्या – 150 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – १८ ते ३४ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://barti.in/
BARTI Pune Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
विद्यार्थी | 150 पदे |
Educational Qualification For BARTI Pune Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विद्यार्थी | १२ वी उत्तीर्ण |
How To Apply For BARTI Pune Notification
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For barti.in Bharti
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/bcBN4 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/MSWY0 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://barti.in/ |
Table of Contents