डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅमअंतर्गत कौशल्य विकासासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी डॅक), च्या सहकार्याने अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र व यशस्वी उमेदवारांचे केवळ अभ्यासक्रम शुल्क बार्टीकडून प्रायोजित करण्यात येणार आहे. प्रायोजकत्वाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी सी-डॅकच्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे नेमून दिलेल्या केंद्रावर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी सी-डॅक कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अर्ज करून परीक्षा दिलेली असणे आवश्यक असून, गुणक्रमांक (रैंक) प्राप्त केलेला असावा, समुपदेशन फेऱ्यांमधून कोणत्याही केंद्रावर पीजीसीपी अभ्यासक्रमासाठी जागा मिळवलेली असावी तसेच स्वतंत्रपणे बार्टी प्रायोजकत्व योजनेसाठी अर्ज केलेला असावा.
या उपक्रमाबाबत माहिती देताना बार्टीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगांच्या गरजा आणि वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील युवक युवती सक्षम, स्वावलंबी व स्पर्धात्मक बनण्यास मदत होणार असून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडणार आहे.
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. सामाजिक समावेशन वाढविणे व युवक-युवतींना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कौशल्य विकास विभागाचे प्रमुख व उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांनी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.
Barti C-DAC Training Program – The Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) will be conducting various postgraduate certificate courses for students from the Scheduled Castes category in the state under the 2026 program. These courses will be conducted in collaboration with the Advanced Computing Training School (ACTS) at the Centre for Development of Advanced Computing (C-DAC), starting from February 2026. The course fees for eligible candidates admitted to these programs will be sponsored by BARTI.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२६ अंतर्गत विविध अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) येथील प्रगत संगणक प्रशिक्षण प्रशाळा (एसीटीएस) यांच्या सहकार्याने फेब्रुवारी २०२६ पासून हे अभ्यासक्रम राबवण्यात येणार असून, अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या पात्र उमेदवारांचे अभ्यासक्रम शुल्क बार्टीकडून प्रायोजित करण्यात येणार आहे.

बार्टीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगांच्या गरजा आणि वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची योजना हाती घेण्यात आली आहे. उपक्रमामुळे अनुसूचित जातीतील युवक-युवती सक्षम, स्वावलंबी व स्पर्धात्मक होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणता येणार आहे. पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना सी-डॅक संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. आवश्यक गुणक्रमांक प्राप्त करावा लागणार आहे. नेमून दिलेल्या केंद्रावर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. स्वतंत्रपणे बार्टी प्रायोजकत्व योजनेसाठी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. महासंचालक सुनील वारे म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. युवक-युवतींना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















