आज बारामतीमध्ये (Baramati) भव्य नमो रोजगार महामेळाव्यात (Namo Rojgar Melava 2024) रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अजित पवारांच्या पुढाकाराने रोजगार मेळावा यशस्वी झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. नमो रोजगार मेळावा उद्योगांना इथे बोलवून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. नमो रोजगार मेळाव्याचे जेव्हापासून बारामतीत आयोजन करण्यात आले तेव्हापासून माध्यमांतून या मेळाव्यास मोठी प्रसिद्धी मिळाली, त्यासाठी माध्यमांचे आभार. त्यांच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणात काम करणारे आम्ही कंत्राटी कामगार आहोत, आमचं कंत्राट पाच वर्षाने रिन्यू होतं. चांगलं काम केलं तर, आपण वर-वरच जाऊ, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

जे-जे येथे आले आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमाकावर आणली आणि आपण लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ. नमो रोजगार मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केलेत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नागपूरमधे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्यात होत्या. या मेळाव्यासाठी 36 हजार अर्ज आहे आणि 55 हजार पदे आहेत. हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. तरुणांनी याचा लाभ घ्यावा. बारामतीचे बस स्थानक एअरपोर्टसारखे आहे तर पोलीस उपमुख्यालाय एखाद्या कॉर्पोरेट ऑफिससारखे. बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारती आहेत.
”तुम्ही लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या, आता मला मोह होतोय की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं, म्हणजे सर्व इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला म्हणू शकतात की, पीएमसी खातंच मला द्या पण, ते देणार नाही, ते माझ्याच कडे ठेवेन. पण, सगळ्या चांगल्या इमारती बांधण्यासाठी तुमची मदत मात्र नक्की घेईन, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















