बीएड अभ्यासक्रम आणि प्रवेश आता राष्ट्रीय स्तरावर, राज्य CET चे पैसे मिळणार परत! – B.Ed Now at the National Level!

B.Ed Now at the National Level State CET Refund fees

राज्याचा अभ्यासक्रम रद्द, ‘एनटीए’ घेणार ‘आयटीईपी’साठी प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार! पूर्वी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून चार वर्षांच्या बीए/बीएस्सी-बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जायची. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. मात्र, ही परीक्षा रद्द झाल्याने अर्जदारांना नोंदणी शुल्क परत मिळणार आहे. हे शुल्क अर्ज करताना वापरलेल्या बँक खात्यात परत केले जाईल. यासंबंधीची सूचना लवकरच राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे (B.Ed Now at the National Level State CET Refund fees).

B.Ed Now at the National Level!

बीएड अभ्यासक्रमात मोठा बदल!
राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद (एनसीटीई) यांच्या सूचनेनुसार, २०२५-२६ पासून चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी, ‘इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम’ (आयटीईपी) हा चार वर्षांचा नवा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) द्वारे घेतली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सीईटी परीक्षा रद्द, आता राष्ट्रीय प्रवेश परीक्षा!
पूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत बीए/बीएस्सी-बीएड अभ्यासक्रम राबवला जात होता. दरवर्षी या परीक्षेसाठी अडीच ते तीन हजार विद्यार्थी अर्ज करतात. या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी सीईटी कक्षाकडे होती, मात्र आता २०२५-२६ पासून हा अभ्यासक्रम पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावर गेला आहे. एनसीटीईने याबाबत फेब्रुवारीमध्येच सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या असून, त्यांना ‘आयटीईपी’ अभ्यासक्रमासाठी परिषदेशी नोंदणी करण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना आता ‘एनसीईटी २०२५’ द्यावी लागणार!
राज्य सीईटी कक्षाने डिसेंबर २०२४ मध्येच बीए/बीएस्सी-बीएड परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरू केली होती आणि परीक्षेची तारीखही घोषित केली होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार, या विद्यार्थ्यांनी आता राष्ट्रीय पातळीवरील ‘एनसीईटी २०२५’ साठी अर्ज करावा लागेल.

एनसीईटी २०२५ परीक्षा – अर्ज प्रक्रिया सुरू!
बीए/बीएस्सी-बीएड अभ्यासक्रमाचा प्रवेश आता राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (एनसीईटी) होणार आहे. ही परीक्षा एनटीए द्वारे २९ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२५
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी www.nta.ac.in आणि https://exams.nta.ac.in/NCET/ या संकेतस्थळांचा वापर करावा लागेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड