राज्यात आयुर्वेदची 611 पदे रिक्त!!!
Ayurveda Doctors Vacant Posts
Ayurveda Doctors Vacant Posts
Ayurveda Doctors Vacant Posts: In government hospitals (health centers) 25% of seats are reserved for Ayurveda doctors. But even during the Corona period, 611 posts of Ayurveda are vacant in the state. Further details are as follows:-
सरकारी दवाखान्यात (आरोग्य केंद्र) आयुर्वेद शास्त्राच्या डॉक्टरांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. पण कोरोना काळातही राज्यात आयुर्वेदची ६११ पदे रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात सध्या १८१६ हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यासाठी ३६३२ एवढी पदे वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गासाठी जागा मंजूर आहेत. साधारणपणे अपेक्षित वैद्यकीय अधिकारी पदे ३६२२ आहते. त्यामध्ये दोन वेळा जाहिरात काढून आजपर्यंत २०४१ पदे भरण्यात आली आहेत. १५८१ पदे शिल्लक असतील. भरलेल्या जागांमध्ये बीएएमएस २५० तर बाकीचे १३३१ ही एमबीबीएसच्या जागा आहेत, असे शासनाचे म्हणणे आहे.
सध्या राज्यात आयुर्वेदची रिक्त असलेली अंदाजे पदे ८६१ असून त्या मध्ये पूर्वी २५ टक्के २५० भरली आहेत. तर उर्वरित ६११ जागा भरणे अपेक्षित आहे.एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने २००५ मध्ये राज्यभरात ७९१ बीएएमएस डॉक्टरांची अस्थायी स्वरूपात नियुक्ती केली आहे. त्यामुळे वार्षिक वेतन वाढ, गट विमा, अंशदायी निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजना या डॉक्टरांना लागू नाहीत. त्यातच कर्तव्यावर मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही. आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे कंत्राटी पध्दतीने ४४ डॉक्टर कार्यरत आहेत. काही डॉक्टर अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत, त्याच डॉक्टरांची सेवा नियमित करून घेतली आहे. त्यामध्ये सध्या कायम किती आहेत, याची सध्या माझ्याकडे आकडेवारी नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.