औरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग मध्ये अनेक पद रिक्त

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2021 Details 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : Aurangabad Mahanagarpalika is going to conduct walk-in interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview.

Aurangabad Mahanagarpalika bharti 2021 Details – Aurangabad Municipal Corporation (AMC) is a Local Government Committed to provide basic infrastructure facilities. The Corporation work for the citizen with the civic body in the field of Education, Public Health creation of Urban Amenities, Art and Culture Heritage Conservation etc.

 

Post Name Posts Education Age Limit
Pediatrician 08  MBBS, MB (Paed) MBBS, DCH

 

Further details are as follows:-

औरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – बालरोगतज्ञ
 • पद संख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, MB (Paed) MBBS, DCH
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद
 • मुलाखतीची तारीख – 29 जून 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

Department Name
Aurangabad Municipal Corporation
Recruitment Name
Aurangabad Mahanagarpalika Recruitment
Name of Posts Pediatrician
Number of Posts 08 Vacancies
How To Apply Walk-In-Interview
Official Website rts.aurangabadmahapalika.org

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3qop45O
अधिकृत वेबसाईट : www.rts.aurangabadmahapalika.org

Aurangabad Municipal Corporation Bharti 2021

Aurangabad Mahanagar Palika Bharti 2021 – औरंगाबाद महानगरपालिका मध्ये अनेक पद रिक्त  आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. वारंवार पाठपुरावा करुनदेखील आकृतीबंधाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. रिक्त पदांमुळे महापालिका संकटात सापडली आहे. वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना कारभार कसा चालवायचा असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.

या संदर्भातील पुढील सर्व जाहिरातीसाठीगुगल प्लेस्टोर वरून महाभरती अँप डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर प्राप्त होतील. 

औरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये पालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात आली. त्यानंतर मात्र नोकर भरतीला ब्रेक लागला. दरम्यानच्या काळात अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्याही वाढली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.

पालिकेच्या प्रशासनाने २०१६ – १७ या वर्षी आकृतीबंध तयार केला आणि तो शासनाला पाठवला. सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे परस्पर आकृतीबंध पाठवला. शासनाने तो आकृतीबंध फेटाळला आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन आकृतीबंध सादर करा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. शासनाने फेटाळलेला आकृतीबंध सर्वसाधरण सभेच्या समोर न ठेवता प्रशासनाने नवा आकृतीबंध तयार करुन तो सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. सर्वसाधारण सभेने नवा आकृतीबंध न स्वीकारता जुन्याच आकृतीबंधात काही सुधारणा सुचवून सुधारणांसह आकृतीबंध शासनाच्या मंजुरीला पाठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वसाधारण सभेच्या आदेशानुसार सुमारे दीड वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने आकृतीबंध शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला. सध्या हा आकृतीबंध नगरविकास खात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधात ४,७७५ पदे नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण पदांची संख्या ९७७४ झाली आहे. नवनिर्मित पदांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूरी दिल्यास पालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आकृतीबंधाला मंजुरी मिळत नसल्यामुळे पालिका संकटात सापडली आहे. विकास कामे करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नाही. त्याशिवाय कर आकारणी व कर वसुलीवरही रिक्त पदांचा परिणाम होत आहे. पालिकेतील बडे अधिकारी येत्या तीन-चार महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिके समोरचे संकट अधिक गडद होणार आहे. नगरविकास विभागाने आकृतीबंधाला मंजुरी दिल्यास पालिकेच्या निवडणुकीपूर्वी नोकर भरती करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
 1. Devika surve says

  Pharmacy job nahiye ka

 2. Devika surve says

  Pharmacist job nahiye ka

 3. सुनिल सोनवणे says

  ड्रायव्हर भरती किंवा जॉब सूचना कधी व ती माहिती कशी मिळेल असा माझा प्रश्न आहे यावर आपली प्रतिक्रिया कळवावी

 4. Dharmpal Gajbhiye says

  I am ready for interview

 5. Syed Asif says

  I am ready..

 6. Syed Asif says

  I am also ready..

 7. Riya says
 8. Riya says
 9. Krishna sham Rathod says

  I am also ready

 10. shubham dhakne says
 11. Sameer chavan says

  Site is not working

 12. santosh rathod says

  site open hot nahi ye…..

 13. Vijay rokade says

  Kadi aahe bharti ata

 14. Swati krushnaro garware says

  I am nursing pass out I have 6year ex. I am anm nursing pass out and Gnm 2year rnig. I want job plz.

 15. अजर शेख says

  नवीन भर्ती ची अबडेट कधी येईल २०२०

 16. अजर शेख says

  औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद लवकरात लवकर नवीन भर्ती काडावी ही नम्रविनंती औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद मधे सपुनं अधीकारी ६० वर्षा पेकशा जासत वया चे झाले आहे 🙏

 17. Mujib says

  Job please

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड