सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच पदोन्नती
Assistant Motor Vehicle Inspector Bharti
राज्यात ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच पदोन्नती
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत.
Assistant Motor Vehicle Inspector Bharti : करोनामुळे परिवहन खात्यातील भरारी पथकांचा महसूल निम्म्याने घटला आहे. मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विलंबानेच का होईना पण, परिवहन खात्याने राज्यातील ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महत्त्वाचे – आरटीओ’निरीक्षकांची 800 हून अधिक जागा रिक्त!
राज्यात परिवहन खात्याच्या अखत्यारितील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन अशी (आरटीओ) ५० कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या अखत्यारित ५० ते ७५ भरारी पथके आहेत. या पथकांकडून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. टाळेबंदी काळात या पथकांची कारवाई बंद होती. त्यामुळे यावर्षी केवळ ३९ कोटी ९७ लाख २४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल मागच्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यात पुन्हा मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने भरारी पथकांना कारवाईसाठी बाहेर पडता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सहा सहायक अधिकाऱ्यांनाही पदोन्नती – Assistant Motor Vehicle Inspector Bharti
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने सहा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदावर पदोन्नती देण्याचा प्रस्तावही सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. त्यामुळे हे सहा अधिकारीही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
‘‘परिवहन खात्याने ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि काही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निश्चित केले आहे. हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे गेला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. नियुक्ती करताना जास्त जागा रिक्त असलेल्या आरटीओ कार्यालयांना प्राधान्य दिले जाईल.’’
सोर्स : लोकसत्ता
Pepar keva aahe