पुण्यात ३० आरोग्य निरीक्षक पदांसाठी ४,१२६ अर्ज प्राप्त!! | Pune Arogya vibhag Bharti 2026

Arogya Vibhag Pune Bharti 2026

पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने ३० आरोग्य निरीक्षकांची भरती करण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यासाठी तब्बल चार हजार १२६ अर्ज प्राप्त झाले असून, एका जागेसाठी १३८ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी निवडीत प्रशासनाचाच कस लागणार आहे. पुणे शहरात दररोज सुमारे २८०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. हा कचरा विविध भागातून संकलन करणे, तो कचरा संकलन केंद्रावर पोहचविणे, तेथे वर्गीकरण करून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पांवर पाठविला जातो. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते स्वच्छ ठेवणे, आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ नयेत, यावर नियंत्रण ठेवणे, शहर घाण करणाऱ्यांवर कारवाई करणे, शिस्त लावणे यासह विविध प्रकारची कामे निरीक्षकाला करावी लागतात. आरोग्य निरीक्षकाच्या ३० जागांसाठी चार हजार १२६ अर्ज प्राप्त झाले असून, एका जागेसाठी १३८ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी एक हजार ३१२ अर्ज आले आहेत. तेथे एका जागेसाठी ४४ उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे. आता प्राप्त झालेल्या अर्जाची गुणवत्तेच्या योग्य त्या निकषांप्रमाणे छाननी केली जाईल. ज्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल.


 

Arogya Vibhag Pune Bharti 2026: Arogya Vibhag Pune has published the notification for the Post of “Psychiatrist, Medical Practitioner & Care Givers”. There are various vacancies available to fill with posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates can apply offline. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last Date for submitting application is 27th of July 2026. For more details about Arogya Vibhag Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in

आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत “मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक आणि काळजी घेणारे पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक आणि काळजी घेणारे 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ जुलै २०२६ 
  • अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in/

How To Apply For Arogya Vibhag Pune Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/vMs0l
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in/


Arogya Vibhag Pune Bharti 2026

महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासह आरोग्य विभागातील भरती व पदोन्नतीसंदर्भातील प्रस्तावांना विधी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असल्याची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिली.

नवीन सुधारित नियमांनुसार, श्रेणी-४ मधून श्रेणी-३ मध्ये रूपांतरित झालेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भातील निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यात आला आहे. ५८ वर्षांनंतरही सेवेत राहण्याची इच्छा असलेल्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांना लेखी अर्जाच्या आधारे सेवा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती अनिवार्य राहणार आहे. तसेच, ६० वर्षांपर्यंत सेवा केल्याचे गृहित धरून अंतिम वेतनाची गणना केली जाणार असली तरी त्याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उपआरोग्य निरीक्षक आणि प्रमुख आरोग्य निरीक्षक पदांच्या भरती व पदोन्नती नियमांमध्येही बदलांना मान्यता देण्यात आली आहे. प्रमुख आरोग्य निरीक्षक पदासाठी अनुभवाची अट सुधारित करण्यात आली असून, उपआरोग्य निरीक्षक पदासाठी १०० टक्के पदोन्नतीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हे सर्व प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर सादर करण्यात येणार आहेत.

Table of Contents

1 thought on “पुण्यात ३० आरोग्य निरीक्षक पदांसाठी ४,१२६ अर्ज प्राप्त!! | Pune Arogya vibhag Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड