JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आरोग्य विभागातील विविध पदांची भरती टप्प्या टप्प्याने लवकरच सुरु होणार!! – Arogya Vibhag Recruitment 2026

Arogya Vibhag Bharti 2026

आरोग्य विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने जिथे काम सुरू आहे तिथे नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी सांगितले. सदस्य नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागातील पदभरतीसाठी नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे 10 हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या सेवासंबंधीही निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, त्यांच्या वेतन आणि हक्कांबाबत तक्रारी आल्यास त्या गांभीर्याने घेतल्या जातील. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या भरतीसाठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा!! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 

Arogya Vibhag Bharti 2026: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer”. There are total of 1440 vacancies are available. The application is to be done Online. Candidates need to submit there application to given link before last date. Last Date for submitting application is 20th March 2026.For more details about Arogya Vibhag Bharti 2026 , visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण १४४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आरोग्य विभाग भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे.

Arogya Vibhag Recruitment 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभाग भरती २०२६

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या1440 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –18- 43 वर्षे
  • अर्ज शुल्क-
    • अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु. १०००/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. ७००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026
  • अधिकृत वेबसाईट –  https://morecruitment.maha-arogya.com/

Arogya Vibhag Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी १४४०  पदे

Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अएम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस

Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी गट-अ56,100 – 177500/-

अर्ज भरण्यासाठीच्या सूचना-

उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साधांकीत प्रती UPLOAD करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा जर्ज स्वीकारला जाणार नाही.
३.१ जन्म प्रमाणपत्र किया शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
३.२ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे अधिवास/Domicia) प्रमाणपत्र
३.३ राखीव प्रवर्गातून अर्ज केल्यास जात व जात वैधता प्रमाणपत्र
२.४ राखीव प्रवर्गातून अर्ज केल्यास लागू असेल त्या प्रवर्गास शासकीय नियमानुसार आवश्यक असलेले Non-Creamy-Layer प्रमाणपत्र,
३.५ सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास उमेदवारांसाठी विभाग, शा.नि.क्र.महिआ २०२३/प्र.क्र.१२३/का-२. दि.११.०३.२०२४ माध्ये नमुद केलेल्या तरतुदी लागू राहतील.
पृष्ठ१४८
३.६ जाहिरातील परिच्छेद ८.४नुसार आंतरवासिता (nternship) पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
३. अर्जाच्या दिनांकास वैध असलेले महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC)/भारतीय वैद्यक परिषद (NMC) यांचेकडीलनोंदणी प्रमाणपत्र /Renewal receipt नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
जात नसावा ३.८. स्वतःया पासपोर्ट साईज फोटोpal height and to pixel width
३.९ स्वस्वाक्षरीचा नमुना (PNG) (poel height and poel width) [१०क्षा जास्त नसावा
३.१० आधार कार्ड
३.११ परदेशातुन एमबीबीएस पदवी घेतलेल्या उमेदवाराची NEBE गुणपत्रिका
३.१२ वैद्यकीय पदवीच्या प्रत्येक वर्षाच्या गुणपत्रिका, पदवी/पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर यांचे प्रत्येका वर्षाचे गुणपत्रिका व पदवी पदव्युत्तर पदविका पदव्युत्तर पदवी यांचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज ग्राहय बरला जाणार नाही.
३.१३ दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र (Oning certificate
३.१४ खेळाडू प्रर्वगातुम अर्ज करीत असल्यास, शालेय शिक्षण क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्र.राहीयो. २००२/प्र.क्र.६८/क्रियुरी-२, दि.०१.०७.२०१६, तसेच शासन शुध्दीपत्रक हलेय शिक्षण व क्रिता विभाग, क्र.राक्रीयो-२००२/प्र.क्र.६८/क्रियुसे-२, दि.१८.०८.२०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिता विभाग, क्र.संकीर्ण-भाता/प्र.क्र.१८/क्रियुसे-२, दि.३०.०६.२०२२ व तद्नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचे प्रमाणपत्र तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्र. राक्रीधी २००२/प्र.क्र.६८/क्रियुसे-२, दि.०१.०७.२०१६. मधील सर्वसाधारण अर्हतामधील मुद्दा ७.४ (४) नुसार अर्जासोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रिता प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत व खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो याबाबत प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
३.१५ उमेदवारांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल असल्यास त्याबाबतची कागदपत्रे अपलोड करावीत,
(एफआयआर, इत्यादी (Document PDF les should not be more than 90 MB each)
३.१६. उमेदवाराने अर्जात मरलेली माहिती खोटी असल्यास प्रमाणपत्रे जाहिरातीनुसार वैध नसल्यास अथवा चुकीचे आढळल्यास नियुक्तीचे कोणत्याही टण्यांवर उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

How To Apply For Arogya Vibhag Arj 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा!! 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Application 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/IxbIg
👉ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/CFaqu
✅ अधिकृत वेबसाईट https://morecruitment.maha-arogya.com/

Public Health Department of Maharashtra State has released the official notification for Medical Officer in 2026. There are a total of 1440 vacancies available. Interested candidates can apply online through official https://arogya.maharashtra.gov.in/ website as per the guidelines. The online application opens on 27-02-2026 and closes on 20-03-2026. Always check the official https://arogya.maharashtra.gov.in/ website for updates. For more details about Arogya Vibhag Recruitment 2026 Details, Arogya Vibhag  Application 2026,  Arogya Vibhag Job 2026, Arogya Vibhag  Vacancy 2026, Arogya Vibhag Bharti 2026,  visit our website www.MahaBharti.in.

Arogya Vibhag Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentPublic Health Department
👉 Recruitment Details Arogya Vibhag Recruitment 2026
❇️ Name of Posts1440
📍Job LocationMaharashtra
✍Application ModeOnline
🌐Official WebSite https://morecruitment.maha-arogya.com/

Arogya Vibhag MO Vacancy 2026

VacancyArogya Vibhag MO Vacancy 2026

Eligibility For Arogya Vibhag Medical Officer Recruitment 2026

Educational QualificationArogya Vibhag MO Recruitment 2026

Age Criteria For Arogya Vibhag MO Application 2026

Age LimitArogya Vibhag MO Application 2026

Application Fee For Arogya Vibhag Medical Officer Notification 2026

Application FeeArogya Vibhag Medical Officer Notification 2026

Application Mode For Arogya Vibhag MO Form 2026

Application ModeArogya Vibhag MO Form 2026

Selection Process For Arogya Vibhag MO Job 2026

Selection ProcessArogya Vibhag MO Job 2026

Salary Details For Arogya Vibhag MO Bharti 2026

SalaryArogya Vibhag MO Bharti 2026

All Important Dates For Arogya Vibhag MO Apply Online 2026

⏰Last Date 20th March 2026

arogya.maharashtra.gov.in Job 2026 Important Links

📑 Advertisement Read Pdf
👉 Apply OnlineClick Here
✅ Official Website https://morecruitment.maha-arogya.com/

राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येणार आहे. आदिवासी व दुर्गम भागातील रिक्त पदे प्राधान्याने भरल्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदभरती केली जाणार आहे.

या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे आदिवासी भागातील विशेषतज्ञ डॉक्टरांसह सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरली जाणार आहेत. गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील विविध आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांतील आरोग्य संस्थांना भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतरच ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आदिवासी भागात पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि अन्य सोयी-सुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अनेक पदे दीर्घकाळ रिक्त राहत होती. परिणामी रुग्णसेवेवर परिणाम होत होता. नव्या धोरणानुसार बिगर आदिवासी भागात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार आदिवासी व दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2026

राज्यातील दुर्गम व आदिवासी भागांतील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नव्या पदभरतीत तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर (पीजी) शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रथम आदिवासी व दुर्गम भागात नियुक्ती देऊन तेथील रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी विविध आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांतील आरोग्य संस्थांना भेटी देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा निर्णय जाहीर केला असून त्यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तज्ज्ञ डॉक्टरांसह सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत.

आदिवासी भागात मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. परिणामी अनेक पदे दीर्घकाळ रिक्त राहत होती. आता मात्र बिगर आदिवासी भागात सेवा बजावणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही आदिवासी व दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Maharashtra Health Department Bharti 2026

राज्यातील शहरी आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती व कटक मंडळांसाठी आरोग्य अधिकारी, नगरपालिका हे पद वैद्यकीय आरोग्य अधिकारी (गट-अ) संवर्गात टप्प्याटप्प्याने निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावर अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात आली आहे.

सार्वजनिक विभागाच्या शासन निर्णयानुसार शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना झाली आहे. त्याअंतर्गत नगरपालिकांमध्ये स्वतंत्र आरोग्य अधिकारी नेमण्यास मान्यता मिळाली आहे. संबंधित पदे निर्माण होईपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांची नागरी संस्थांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये मआरोग्य अधिकारीफ पदनिर्मितीबाबत अभ्यास करून शिफारस करण्यासाठी उपसंचालक, आरोग्यसेवा, परिमंडळ, पुणे (अध्यक्ष), उपसंचालक, आरोग्यसेवा, परिमंडळ, ठाणे (सदस्य), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली (सदस्य-सचिव) या तीन अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
आरोग्य अधिकारी व अधीनस्त कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करणे, शहरी आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी प्रशासकीय सुधारणा व उपाययोजना सुचविणे, नागरी संस्थांचा आरोग्यसेवांमधील सहभाग वाढविण्यासाठी कार्यपद्धती ठरविणे, परिमंडळ व जिल्हास्तरावर शहरी आरोग्यसेवांचे प्रभावी पर्यवेक्षण व नियंत्रणासाठी उपाय सुचविणे, अहवाल सादर करण्याचे निर्देश या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.


Maharashtra Health Department Bharti 2026

राज्यातील ग्रामीण व शहरी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागात सुमारे ५ हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा, काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र वर्ष संपत आले तरी या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा मावळू लागल्या आहेत.

राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन, विविध कार्यक्रम, पाहणी दौरे आणि भेटीगाठी यामध्ये लोकप्रतिनिधी व्यस्त असताना, प्रत्यक्षात मात्र आरोग्य विभागातील मनुष्यबळाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हतबल झाली असून, विद्यमान कर्मचारी अतिरिक्त कामाच्या ताणाखाली सेवा देत आहेत. नेत्यांच्या भाषणांमध्ये आरोग्य सेवेसाठी वेगवान निर्णय, युवकांना रोजगाराच्या संधी, अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी जमिनीवरील वास्तव मात्र वेगळे आहे. फाईल अंतिम टप्प्यात आहे, अर्थ विभागाची मान्यता येणे बाकी आहे, हीच वाक्ये वारंवार ऐकून विद्यार्थी आता थकले आहेत.
जर पदांची गरज आहे, रिक्त जागा आहेत आणि मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते, तर मग जाहिरात प्रसिद्ध होण्यास इतका विलंब का? असा सवाल स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांनी शासनाकडे तातडीने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे.


 

Maharashtra Health Department Bharti 2026

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026 – Many primary health centers in rural areas are struggling due to insufficient staff, and the existing employees are working under immense pressure due to the extra workload. Some time ago, assurances were given that the file for the recruitment of 5,000 posts in the health department was in its final stages and the advertisement would be published soon under Arogya Vibhag Bharti 2026. However, only announcements are being made, and no concrete action is visible regarding the recruitment process. This has led to fading hopes among thousands of young people who have been preparing for competitive exams for many years.

 

राज्यातील (अहिल्यानगर) ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागात सुमारे ५ हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र वर्ष संपत आले तरी या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन, विविध कार्यक्रम, पाहणी दौरे आणि भेटीगाठी यामध्ये लोकप्रतिनिधी व्यस्त असताना, प्रत्यक्षात मात्र आरोग्य विभागातील मनुष्यबळाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हतबल झाली असून, विद्यमान कर्मचारी अतिरिक्त कामाच्या ताणाखाली सेवा देत आहेत. काही काळापूर्वी आरोग्य विभागातील ५ हजार पदांच्या भरतीसाठीची फाईल अंतिम टप्प्यात असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ घोषणाच होत असून भरती प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा मावळू लागल्या आहेत.

 

नेत्यांच्या भाषणांमध्ये तसेच सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ‘आरोग्य सेवेसाठी वेगवान निर्णय’, ‘युवकांना रोजगाराच्या संधी’ अशा आकर्षक घोषणा दिल्या जात असल्या तरी जमिनीवरील वास्तव मात्र वेगळे आहे. ‘फाईल अंतिम टप्प्यात आहे’, ‘अर्थ विभागाची मान्यता येणे बाकी आहे’ हीच वाक्ये वारंवार ऐकून विद्यार्थी आता थकले असून, शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘जर पदांची गरज आहे, रिक्त जागा आहेत आणि मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते, तर मग जाहिरात प्रसिद्ध होण्यास इतका विलंब का?’ असा थेट सवाल स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थित करत आहेत. वाढती महागाई, कुटुंबीयांचा दबाव आणि नोकरीची अनिश्चितता यामुळे अनेक युवक मानसिक तणावात आहेत.
विद्यार्थ्यांनी शासनाकडे तातडीने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या काळात तीव्र आंदोलन, मोर्चे व आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे. आरोग्य व्यवस्थेचा कणा मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या या भरतीकडे शासन गांभीयीने लक्ष देणार का, की पुन्हा एकदा ही घोषणा केवळ कागदावरच राहणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेलाही पडू लागला आहे.

 


 

 

Arogya Vibhag Bharti 2025: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer”. There are total of 1440 vacancies are available. The application is to be done offline. Candidates need to submit there application to given address before last date. For more details about Arogya Vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण १४४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. या भरतीची नवीन जाहिरात लवकरः प्रकाशित होणार आहे. या संदर्भातील एक परिपत्रक खाली दिले आहे. पूर्ण जाहिरात आणि माहिती आम्ही लवकरच महाभरती वर उपलब्ध करू.

 

Arogya Vibhag Bharti 2025 

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या1440 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच जाहीर होणार
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी १४४०  पदे

Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अएम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस

Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी गट-अ56,100 – 177500/-

How To Apply For Arogya Vibhag Online Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Application 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/PiRye
✅ अधिकृत वेबसाईटhttps://shorturl.at/dgkL5

 

Table of Contents

1 thought on “आरोग्य विभागातील विविध पदांची भरती टप्प्या टप्प्याने लवकरच सुरु होणार!! – Arogya Vibhag Recruitment 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड