खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार
Arogya Vibhag Bharti 2020- 17000 Vacancies
आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड; अधिकारी संवर्गासह १७ हजारांवर पदे रिक्त
राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. धोरणात्मक पदांवर प्रभारीराज असल्याने व्यवस्थापन विस्कळित आहे. मात्र, सरकारची मानसिकता आणि सोयीच्या खुर्च्यांवर बसलेल्या अधिकाऱ्यांची आडकाठी यामुळे पदोन्नत्याच होत नाहीत. परिणामी, राज्याच्या आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांची कीड लागल्याचे चित्र आहे.
वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड सी व डी अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वेळेत भरती न केल्याने वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पुढील संवर्गातील रिक्त पदांचा आजार अधिक दुर्धर होत आहे. आता कोरोना काळात तरी सरकार काही पावले उचलून यातून मार्ग काढेल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक वैद्यकीय अधिकारी (वर्ग दोन) या उपलब्ध सव्वासहा हजार पदांमधून पुढच्या संवर्गातील अधिकारी मिळणार आहेत; पण त्यासाठी पदोन्नतीची प्रक्रिया गरजेची आहे. मात्र, पदोन्नत्या झाल्यानंतर मूळ पदाचा अधिकारी येऊन आपली सोयीची खुर्ची जाईल या भीतीमुळे या प्रभारींकडूच पदोन्नतीस आडकाठी होत आहे.
काय आहेत रिक्त पदांची कारणे
- -वेळेवर भरती नसल्याने एमओ मिळत नाही
- -भरती, पदोन्नतीचे टप्पे वेळेवर होत नाहीत
- -एमओ टू स्पेशालिस्टची प्रमोशन प्रक्रिया वेळेवर नाही
- -सीएस केडरची प्रमोशन प्रक्रियाही कायम रखडलेली
- -अनेक अधिकाऱ्यांचे चार्ज घेऊन सोयीच्या जागांवर ठाण
- -पदोन्नतीच्या पदांवरील अनेक अधिकारी प्रभारी
- -पदोन्नत्यांत सरकारची उदासीनता, सोयीची जागा जाईल म्हणून प्रभारींचीही आडकाठी
काय आहे पर्याय - -वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर करणे
- -उपलब्ध एमओंची ज्येष्ठता यादी काढून स्पेशालिस्टचे प्रमोशन
- -याच सिनिॲरिटीतून वर्ग एक अधिकारी पदाचे वेळेत प्रमोशन
प्रभारीराजमुळे काय आहेत अडचणी
- -प्रभारींच्या सूचनांची फारशी दखल घेतली जात नाही
- -पात्रता असूनही पदोन्नती मिळत नसल्याने मानसिकतेवर परिणाम
- -प्रभारींमुळे खालील रिक्त पदेही भरली जात नाहीत
- -प्रभारींमुळे यंत्रणा सक्षमपणे चालू शकत नाही
सहा वर्षांपासून पदोन्नत्या करण्याचे कार्यालयीन सांगितले जात आहे. लोक उपलब्ध नाहीत हे चुकीचे आहे. वर्षांनुवर्षे पदोन्नत्या न केल्यामुळे पदे रिक्त आहेत. परिणामी, वैद्यकीय अधिकाऱ्यांत असंतोष आहे. कोविडमध्ये कालबद्ध कार्यक्रम आखून शासनाने पदभरती, पदोन्नत्या कराव्यात.
आताच प्राप्त बातमी नुसार कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.
Table of Contents
Mi ANM aahe mala job milel k
8007734211
Mi ANM aahe mala job milel k