महत्वाचे! आरोग्यसेवक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी रखडली! । Arogya Sevak Bharti 2024

Maharashtra Arogya Sevak Bharti 2024

Maharashtra Arogya Sevak Bharti 2024 Update

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शासनाच्या जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष (५० टक्के) उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणीस स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरोग्यसेवक उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. आरोग्यसेवक पुरुष उमेदवारांच्या भरतीप्रक्रियेदरम्यान हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना भरती करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १९ हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली. उर्वरित १२५ जागांवर मेरीट उत्तीर्ण आरोग्यसेवक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी शासनाने आदेश काढले होते. त्यानुसार बुधवार (दि. ४) पासून मेरीट उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीस आरोग्य विभागाकडून सुरुवात होणार होती. मात्र, अचानक हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयात उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणी प्रक्रियेवर रिट याचिकेद्वारे आक्षेप घेतला. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत सद्यस्थितीत मेरीट उत्तीर्ण कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रे तपासणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगितच राहणार आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोग्यसेवक पुरुष कर्मचाऱ्यांच्या नशिबी वाट पाहणे आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 


Maharashtra Arogya Sevak Bharti 2024: जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबवली होती. यातील बहुतांश पदांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, आरोग्यसेवकांना वर्षभराचा कालावधी उलटूनही नियुक्त्या देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे गुणवत्ताप्राप्त उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषदेसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात ५० टक्के पुरुष आरोग्यसेवकांच्या १२३ पदांचा समावेश होता. गुणवत्ता प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची अद्यापही तपासणी झालेली नाही. उमेदवारांचे वाढते वय, त्यांना करावा लागणाऱ्या आर्थिक अडचणींच्या सामन्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता असून पुन्हा आचारसंहिता लागू झाल्यास निवड झालेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा चार महिने प्रतिक्षा करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे.


Maha Arogya Sevak Bharti 2024 New Rule

जिल्हा परिषदेंतर्गत भरती केल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक (५० टक्के) पदाची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे. ही भरती प्रक्रिया शासनाच्या जाहिरातीतील नमूद दि. ४ मे २०२२ तसेच दि. १५ मे २०२३ च्या परिपत्रकाप्रमाणे करण्याची मागणीही गुणवत्ताधारक विद्याथ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये केली आहे. राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पद (५० टक्के) या पदासाठी आयबीपीएसमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्याची प्रक्रिया चालू आहे. यामध्ये या पद भरतीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कुठेही उल्लेख नसलेल्या दि. ५ एप्रिल २००३ च्या सेवा प्रवेश नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येत आहे.

 

ही बाब अत्यंत चुकीची असून त्यामुळे गुण- वत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन ते या सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच बाब गुणवत्ताधारक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुर्दैवाने प्रशासन या विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीकडे हेतुतः डोळेझाक करताना दिसत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थी नियमाप्रमाणे या पदांची भरती करण्यात यावी अशी अपेक्षा बाळगन आहेत. तसेच जाहिरातीतील नमूद ‘प्राधान्य’ शब्दाच्या चुकीच्या अर्थामुळे प्रशासनात गोंधळ उडाला असून प्रशासनाच्या या गोंधळाची शिक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहन करण्याची वेळ येते की काय ? असे दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षेत प्राधान्य शब्दाचा अर्थ असा आहे की, अन्य बाबी गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्‌या समान असतील तर अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे की, नियुक्त्यांमध्ये अनुसरण करण्यात येणारे प्राधान्याचे नियम आरक्षणाचे नाहीत आणि याचा अर्थ फक्त असा आहे की, गुणवत्ता आधारित दोन उमेदवारांमध्ये सर्व गोष्टी समान असतील, तर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. मात्र ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडेच जिल्हा परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद प्रशासन जर या निकषाप्रमाणे काम करणार नसेल तर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 


Arogya Sevak Bharti 2024: महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील परिशिष्ट पाच-अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग-३/ गट-क) (आरोग्य) श्रेणी-३ मधील अनुक्रमांक एक येथील आरोग्य सेवक नोंदीसमोर स्तंभ क्र.४ मध्ये, “नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती” या शीर्षकाखाली, प्रचलीत नियमांऐवजी, पुढीलप्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर, डाउनलोड करा ! – Aarogya Vibhag Bharti Selection List, Waiting List

“(१) आरोग्य सेवक (पुरुष) पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल, –
“(अ) जिल्हा परिषद सेवेतील गट-ड (परिचर) हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वषर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन, खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने, म्हणजे, –
(१) विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण; आणि
(२) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) यांचेसाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण
केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांचेकडून घेण्यात येणारे १२ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने
समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.
(ब) निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने, म्हणजे, –

(१) वयोमर्यादा :-
(अ) किमान वयोमर्यादा.- पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहिल.

(ब) कमाल वयोमर्यादा. – पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय अडतीस वर्षा पेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचे वय त्रेचाळीस वर्षा पेक्षा जास्त असू नये.

आरोग्य विभागात ‘ड’ वर्गातून भरती; १,७२३ पदे रिक्त – ३३ टक्के पदे महिला रोस्टर पद्धतीवर भरती करून घेतल्या जाणार ! – Arogya vibhag Group D Bharti 2024

(२) किमान शैक्षणिक पात्रता :-

(अ) विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण; आणि
(ब) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) यांचेसाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांचेकडून घेण्यात येणारे १२ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.
(२) आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण अनुक्रमे २५ ७५ असे राहील.
(३) आरोग्य सेवक (पुरुष) पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर, जेथे लागू असेल तेथे, त्याबाबतीत केलेल्या नियमानूसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
(४) (१) पदोन्नतीने आरोग्य सेवक (पुरुष) या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील.
(२) आरोग्य सेवक (पुरुष) या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण केलेली नसेल अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविलेली नसेल तर, नियुक्तीनंतर संबंधित नियमांत नमूद केलेल्या विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही.

(५) (१) पदोन्नतीने आरोग्य सेवक (पुरुष) या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून पदोन्नतीपूर्वी सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील.

(२) आरोग्य सेवक (पुरुष) या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार, संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास, याबाबतच्या नियमांत नमूद केलेल्या विहीत मुदतीत सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास, सदर संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही.

Download Arogya Sevak Bharti PDF

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड