उच्च न्यायालयाने दिलेल्या नि्देशाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक मुले असल्यास, त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीच्या लाभास अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला.
मॅटने याचिकाकर्त्याला अनुकंपा नियुक्तीस अपात्र ठरविल्यानंतर त्याने या निर्णयाला आव्हान दिले होते. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. प्रतिवादीने केलेला
याचिकाकर्तीचा दावा
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाची घोषणा) नियम लागू होण्यापूर्वी तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यामुळे ही सूचना लागू होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकारने मॅटने दिलेल्या निकालाचे समर्थन केले.
दावा आणि मॅटच्या निर्णयाचा विचार केला असता, आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. विद्या अहिरे यांच्या पतीचा ११ फेब्रुवारी २०१३ रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पतीच्या जागेवर मुलाच्या अनुकंपा नियुक्तीची मागणी केली. २८ मार्च २००१ च्या अधिसूचनेनुसार, दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना लाभ नाकारण्यात आला होता.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















