अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी, भरतीचा मार्ग मोकळा! | Anukampa Bharti 2023

Anukampa Bharti 2023

Anukampa Bharti 2023

Anukampa Bharti 2023: The latest update for Anukampa Recruitment 2023 Maharashtra. Adhyaksha Prakash Nikam’s meeting with Chief Minister Eknath Shinde resulted in the delayed recruitment process of the Palghar Zilla Parishad candidates due to compassion. As per the instructions received from the government, the path of compassionate recruitment has become easier. For more details about Maharashtra Anukampa Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्याने २०१४ पासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून शासनाकडून मिळालेल्या निर्देशामुळे अनुकंपा भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच २०१४ पासूनचे जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सध्याचे विद्यमान उपाध्यक्ष, सर्व समिती सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून काही दिवसांत अनुकंपा उमेदवारांची भरती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. भरती करण्याकरिता शासनाकडून जे मार्गदर्शन मागवले होते ते जिल्हा परिषद अध्यक्ष निकम यांनी प्राप्त करून शासनाकडे सादर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे भरतीबाबतची पुढील प्रक्रिया जिल्हा परिषदेतमार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 



प्रकाश निमक यांनी आवाहन केल्याप्रमाणे कुठलाही गैरव्यवहार न होता पारदर्शकपणे ही भरती करण्यात येईल, असे सांगण्यात आले असले तरी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वाखाली भरती झाली होती, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केले होते, हा गैरप्रकार उघडकीस येऊन या सर्व अधिकाऱ्यांना न्यायालयाने कोठडीत ठेवले होते; मात्र कोरोनाच्या काळात कारागृहात कैद्यांची गर्दी झाल्याने या अधिकाऱ्यांना अटी-शर्तीवर सोडण्यात आले होते. त्यातील काही अधिकारी पुन्हा पालघर जिल्हा परिषदेमध्ये आता कार्यरत आहेत. अनुकंपामधील बऱ्याच उमेदवारांची वये उलटून गेली आहेत. त्यामुळे भरतीमध्ये पुन्हा गैरप्रकार होण्याची शक्यता अनुकंपामधील उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

 


 

देशाच्या sympathizers अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरळसेवा भरतीतंर्गत 75 हजार जागा भरण्याचा निर्णय शासनाने केला आहे. यात सरळसेवा कोट्यातील प्रति वर्ष रिक्त होणार्‍या 20 टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरावयाची संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नवीन यादी प्रकाशित करुन 2022 च्या अनुकंपा भरती प्रक्रिया सुरुवात करण्यात यावी हि मागणी सध्या जोर धरत आहे.

तसेच, गोंदिया जिल्हा परिषदेला जवळपास 180 अनुकंपाधारक नियुक्तीची वाट पहात आहेत. 2005 नंतर ज्या कर्मचार्‍यांची नियुक्ती झाली अशा कर्मचार्‍यांच्या निधनानंतर पेंशन सुद्धा लागू झाली नाही. त्यामुळे अशा कुटूंबांना आर्थिक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश जिल्ह्यात अनुकंपाची नवीन यादी प्रकाशित झाली असून गोंदिया जिल्ह्यातील भरती प्रक्रिया मागे का, असा प्रश्न अनुकंपाधारकांसमोर आहे. या 180 अनुकंपाधारकांवर जवळपास 300 कुटूंबांची जबाबदारी आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची नवीन यादी प्रकाशित करुन 2022 च्या भरती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्यात यावी.


अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या पहिल्या वारसदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला संधी देण्याची अट बेकायदेशीर आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू नये, या उद्देशाने अनुकंपा नोकरीचे धोरण लागू करण्यात आले आहे. संबंधित अटीमुळे या धोरणाची पायमल्ली होते. धोरणानुसार दिवंगत कर्मचाऱ्याचा कोणताही एक वारसदार अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी पात्र आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये प्रथम नाव टाकण्यात आलेल्या वारसदाराची संमती असल्यास त्याच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला संधी दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले.

Anukampa Recruitment 2022 Maharashtra 

Anukampa Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड