शालेय विभागाचा निर्णय! परीक्षा वेळापत्रक बदलाबाबतचा नवीन अपडेट जाहीर! – Announce the Decision on Exam Schedule Changes!
Announce the Decision on Exam Schedule Changes!
राज्यात तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती असताना, शालेय शिक्षण विभागाने यंदा २४ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शिक्षक आणि शाळांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी एप्रिल अखेर शालेय कामकाज लांबवू नये असे परिपत्रक काढणाऱ्या शिक्षण विभागाने यंदा मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे.
गोंधळाचे निर्णय आणि संभ्रम!
दोन वर्षांपूर्वी आणि गतवर्षी शाळांना एप्रिल अखेरीस परीक्षा घेण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामुळे मार्चमध्येच परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन शाळांनी केले होते. तापमानवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यंदा २४ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा संतप्त!
राज्यातील अनेक शाळांनी मार्चमधील वेळापत्रक तयार केले आहे, मात्र अचानक बदल करण्यात आल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
शाळा आता आक्रमक!
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने एससीईआरटीला निवेदन देत ‘पॅट’ परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान घ्यावी, अशी मागणी केली आहे. आता शिक्षण विभाग या मागणीला कोणता प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.