अंगणवाडी सेविका भरती निकाल, अंतिम निवड यादी, मेरिट लिस्ट.. – Anganwadi Sevika Recruitment Final Selection List Soon!

Anganwadi Sevika Result 2025, Merit List

अंगणवाडी सेविका भर्ती साठी हजारो उमेदवारांनी अर्ज सदर केले आहेत.  सध्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची निवड होणार असून, यादीतील माहितीवर १० दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे (Anganwadi Sevika Recruitment Final Selection List). त्यानंतर अंतिम निवड घोषित केली जाईल. इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असून, बारावीचे गुण, पदवी, संगणक ज्ञान व अनुभव यासारख्या निकषांवर निवड होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार शक्य नाही, असे चित्र आहे.

Anganwadi Worker Recruitment Final List Soon!

बारावीला अधिक टक्केवारी मिळालेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असली तरी पदवीधर उमेदवारांना १० अतिरिक्त गुण दिले जात आहेत. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकेचे पद महिलांसाठी व बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विशेष पात्रतेची गरज भासते. सध्या गावखेड्यात उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार उपलब्ध होत असले तरी फक्त बारावीतील गुणांवर भर दिल्यास इतर पात्र उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोरोना काळात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तुलनेने अधिक टक्केवारी मिळाल्यामुळे केवळ त्यावर आधारित निवड होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शासनाने टक्केवारीसोबतच इतर पात्रतेचेही योग्य मूल्यमापन करून सर्वांत सक्षम उमेदवारांची निवड केल्यास ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड