खुशखबर! अंगणवाडीत ६५०० पदांची बंपर भरती सुरु! ५ वी ते १२ वी पास महिला करु शकतात अर्ज!
Anganwadi Bharti Latest News
अंगणवाडीमध्ये ६५०० पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी ५ वी ते १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा देखील असणार आहे. ४० पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता, निकष आणि प्रोसेस काय? जाणून घ्या. ही अंगणवाडी भरती उत्तराखंड राज्यासाठी असणार आहे. या राज्यातील महिला सशक्तिकरणासाठी एकूण ६५०० पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. यापैकी ६१८५ पदं ही अंगणवाडी सहाय्यकेसाठी असणार आहे. तर ३७४ पदं ही ३७४ पदं ही अंगणवाडी कार्यकर्त्यांची आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या पदांसाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतील.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अट असणार आहे. या पदासाठी केवळ महिलांना अर्ज करता येणार आहेत. ज्या महिला मान्यता प्राप्त बोर्डातून १० किंवा १२ वी पास उत्तीर्ण असतील, अशा महिला या पदासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. तर अंगणवाडी सहाय्यीका पदासाठी पाचवी पास महिला सुद्धा अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय १८ ते ४० च्या मध्ये असावं. उत्तराखंड अंगणवाडी भरती प्रक्रिया २ जानेवारी २०२५ पासून सुरु झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ असणार आहे. जर तुम्हालाही या पदासाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला ३१ जानेवारीच्या आधी अर्ज करावा लागेल. तुम्ही www.wecduck.in वर जाऊन अर्ज करु शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आंगनवाडी कार्यकर्त्या आणि सहायिका या सरकारी नोकरीच्या पदांसाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत. ही भरती 6500 हून अधिक पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी उत्तराखंड सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड/परिषद/संस्थेमधून किमान इंटरमीडिएट किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, अर्जदार त्या महसूल गावाची रहिवासी असावी, ज्या गावात आंगनवाडी केंद्र स्थापन केले गेले आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये हायस्कूल प्रमाणपत्र, इंटरमीडिएट प्रमाणपत्र, उपजिल्हाधिकारी यांनी जारी केलेले स्थायी रहिवासी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदणीची प्रत, आरक्षित श्रेणीसाठी सक्षम स्तरावरून जात प्रमाणपत्र, पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र (जर लागू असेल), तसेच प्राधान्य श्रेणीसंबंधित प्रमाणपत्र यांची माहिती विचारल्यास सादर करावी लागेल. याशिवाय, हे देखील नमूद केले आहे की कोणत्याही एका आंगनवाडी केंद्रावर एका कुटुंबातील दोन महिलांची आंगनवाडी कार्यकर्ती व सहायिका म्हणून निवड केली जाणार नाही.