अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा 20 ऑक्टोबर पासून!

Amravati University Exam

Amravati University Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा २० ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत…

Amravati University Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणा­ऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आता २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहेत. २० ऑक्टोबर, २०२० पासूनच्या सर्व परीक्षा यापूर्वी ४ऑक्टोबर,२०२० रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून १२ ते १९ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Amravati University Exam

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परीक्षा देण्याकरिता अॅप विकसित करण्यात आले असून त्याचे प्रात्याक्षिक यापूर्वीच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी युट्यूबवरुन सादर केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरळीतपणे द्याव्या, त्यांना कुठलीही अडचण राहू नये, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास विद्यापीठ वेबसाईट वरील मुखपृष्ठावर न्यूज अॅन्ड अनाउन्समेंट मध्ये विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा­यांची संपर्क यादी दिली असून विद्यार्थी आपल्या अडचणीचे निराकरण करुन घेण्याकरिता संपर्क यादी मधील कोणालाही फोन करु शकतात.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत होतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी व्यक्त केला असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड