अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील रिक्ते पदे, लवकरच भरती होणार!- Amravati Medical College recruitment 2024

Amravati Medical College recruitment 2024

Amravati Medical College recruitment 2024 – सध्या महाराष्ट्र राज्यातील विविध रुग्णालये आणि वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना आणि गरीब जनतेला त्रास होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हेच चित्र असल्याचे समजते. त्यात अमरावती जिल्ह्यातील विशेषतः मेळघाटातील आरोग्य सेवा कोलमडली असून बालमृत्यू आणि मातामृत्यू होत असल्याने शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आक्रमक मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत राज्यातील विविध रुग्णालयांत असलेल्या रिक्त पदांबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली.

 

विधानसभेत  या विषयावर बोलताना आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारला धारेवर धरले. या सरकारचा कार्यकाळ संपत आला असतानाही अद्याप सरकारने रुग्णालयांमधील रिक्त पदे भरली नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यातील नवजात शिशू यांच्याबाबत मोठा प्रश्न आहे. मेळघाटातील असलेल्या शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढते आहे. नवजात शिशूंबाबत कोणत्याही सोयीसुविधा नाहीत याकडे शासनाने लक्ष द्यावे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले मात्र तेथे २२ पदे ऱिक्त आहेत (Super Speciality hospital Amravati vacancy). दंतचिकित्सा महाविद्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच इरविन रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. अंमली पदार्थ, नवजात शिशू, कर्करोग, यासारख्या रोगांबाबत चर्चा केली जाते. मात्र, पदे भरली जात नाहीत. आता आचारसंहिता लागू व्हायची वेळ आली मात्र सरकार पदेभरत नाही, तातडीने ही पदे भरावीत अशी मागणी यावेळी ॲड.ठाकूर यांनी केली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड