आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात विविध पदांसाठी भरती – All India Radio Recruitment 2022
Aakashwani Mumbai Bharti 2022 – All India Radio Recruitment 2022 – तुमचे पत्रकारीतेचे शिक्षण पूर्ण झाले असेल, तुम्हाला बातमी लिहिण्याचा, वाचण्याचा, संपादन करण्याचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण प्रतिष्ठीत संस्थेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी तुमची वाट पाहत आहे. आकाशवाणी मुंबईच्या (Akashwani Mumbai Recruitment) प्रादेशिक वृत्तविभागातर्फे (Recruitment in Regional News Department) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आकाशवाणी मुंबई येथे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार (News reporters-and-translators) , वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर (news editors-and-correspondents), प्रसारण सहाय्यक (Broadcast Assistant),आणि वेब सहाय्यक (Web Assistant)ही पदे भरली जातील.
पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातील पत्रकारिता क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा प्रसारमाध्यमातील ५ वर्षाच्या कामाचा अनभुव असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते ५० वर्षांदरम्यान असावे. मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागेल.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. २० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज सहसंचालक, प्रादेशिक वृत्त विभाग, ५ वा मजला, नवीन प्रसारण भवन, मंत्रालयाच्या पाठीमागे, आकाशवाणी, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठवायचे आहेत.