महत्वाचे, आता राज्य शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन, आदेश जारी!

All Government Services Must Go Online By August 15

All Government Services Must Go Online By August 15 – राज्य सरकारच्या विविध सेवा १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाही, त्याला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपये दंड आकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी या अधिनियमांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. लोकसेवा हक्क आयोगाने बँड अॅम्बेसेडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

All Government Services Must Go Online By August 15

 

सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती व प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सध्या १ हजारपेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. अजून ३०६ सेवा या ऑनलाईन करायच्या आहेत. १२५ सेवा ऑनलाईन असल्या तरी त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्यामुळेच शासनाच्या सर्व विभागांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. शासनाच्या सर्व सेवा व्हॉटसअपसह सर्व संकेतस्थळांवर उपलब्ध झाल्यास अनेक तक्रारी कमी होऊन लोकांचे जीवनमान सुसह्य होईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र डिजिटल गव्हर्नन्समध्ये देशासाठी आदर्श ठरेल, असे मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या. सेवादूत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अभिप्राय कक्ष सुरू केल्याबद्दल यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अन्य जिल्हाधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारे आपापल्या जिल्ह्यांत काम करावे. प्रशासन आणि नागरिकांमधील हा विश्वासाचा पूल आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड