एअर इंडियाने केली वैमानिक आणि केबिन कर्मचारी यांची ९ हजार कर्मचाऱ्यांची भरती!। AIR India Bharti 2024
AIR India Bharti 2024
AIR India Bharti 2024 Loader Vacancies
गेल्या दोन वर्षांपासून भारतीय हवाई क्षेत्राचा जोमाने विस्तार झाला असून, एअर इंडिया कंपनीने गेल्या दोन वर्षांत नऊ हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यामध्ये वैमानिक आणि केबिन कर्मचारी यांची संख्या पाच हजार इतकी आहे. कंपनीचे मुख्याधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे ही माहिती पुढे आली आहे.टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यापासून कंपनीने मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच विमान सेवेचा देखील कायाकल्प सुरू केला आहे. कंपनीने नव्या विमानांची खरेदीदेखील केली आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या १४२ विमाने असून, कंपनीने गेल्या दोन वर्षांत ३५ नव्या मार्गावर सेवा सुरू केली आहे. यामध्ये २५ आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत तर १० देशांतर्गत मार्ग आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासल्यामुळे कंपनीने ही भरती केली आहे. या नव्या भरतीनंतर कंपनीच्या कर्मचान्यांचे सरासरी वय ५४ वरून ३७ इतके झाले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. ही भरती प्रक्रिया एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड (AIASL) यांच्याकडून राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेडकडून जम्मू विमानतळावर ड्युटी ऑफिसर, हँडीमन, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर बरीच पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 26 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
aiasl.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 29 पदांसाठी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. थोडक्यात काय तर दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 28 ते 50 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 18,849 ते 32,200 रूपये पगार दर महिन्याला मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरलेला अर्ज दुसरा मजला, GSD बिल्डिंग, एअर इंडिया कॉम्प्लेक्स, टर्मिनल – 2, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली – 110037 या पत्त्यावर पाठवावा लागेल.
मुंबईत विमानतळ लोडरच्या 600 जागांसाठी 25 हजारांहून अधिक उमेदवार मुलाखतीसाठी पोहोचले. त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या काळातील अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी दिसत आहे. फॉर्म काउंटरवर पोहोचण्यासाठी उमेदवार एकमेकांशी धडपड करताना दिसत आहेत. वृत्तानुसार, अर्जदारांना अन्न-पाण्याविना तासन्तास थांबावे लागले. अशा स्थितीत अनेकांची प्रकृती ढासळू लागली.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमेश्वरने सांगितले की, लोडरच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी 400 किलोमीटरचा प्रवास करून तो येथे पोहोचला आहे. ते म्हणाले, मी शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी आलो आहे. प्रथमेश्वरने पुढे सांगितले की तो बीबीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पण नोकरी लागली तर तो अभ्यास सोडेल. सरकारने रोजगाराच्या संधी वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राजस्थानच्या अलवर येथून मुंबईत आलेल्या आणखी एका उमेदवाराने सांगितले की, त्याच्याकडे एम.कॉम.ची पदवी आहे. तो म्हणाला, ‘मीही सरकारी नोकरीची तयारी करतोय, मला कुणीतरी सांगितलं की इथे पगार चांगला आहे, म्हणून मी इंटरव्ह्यूला आलो आहे.’
एअरपोर्ट लोडरला 20-25 हजार पगार मिळतो
विमानतळावर लोडर म्हणून भरती केलेले कर्मचारी विमानात सामान चढवणे आणि उतरवणे तसेच बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालविण्याचे काम करतात. एका विमानाला सामान, माल आणि खाद्यपदार्थ वाहून नेण्यासाठी किमान 5 लोडर लागतात.
विमानतळ लोडरचा पगार 20,000 ते 25,000 रुपये प्रति महिना असतो. तथापि, बहुतेक लोडर जादा काम करून 30 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतात. लोडरच्या नोकरीसाठी, शैक्षणिक पात्रता मूलभूत आहे तर उमेदवार शारीरिकदृष्ट्या मजबूत असावा.
आठवडाभरापूर्वी 10 पदांच्या रिक्त जागांसाठी हजारो अर्जदार गुजरातमध्ये दाखल झाले होते
यापूर्वी, गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एका खाजगी कंपनीत केवळ 10 पदांसाठी सुमारे 1,800 उमेदवार उपस्थित होते. गर्दी एवढी होती की कार्यालयाच्या एंट्री गेटच्या उतारावरील रेलिंग कोसळले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या गुजरात मॉडेलचा पर्दाफाश केल्याचे म्हटले होते. सत्ताधारी पक्ष बेरोजगारीचे हे मॉडेल संपूर्ण देशात राबवत आहे. भाजपचे खासदार मनसुख वसावा यांनी या घटनेसाठी खासगी कंपनीला जबाबदार धरले.
AIR India Bharti 2023 – It is known that Air India, which is known as the oldest airline company in the country, has undertaken a major recruitment drive in the coming years. According to this, the company is expected to recruit 500 new employees every month for the next few months. The company has already started the process of hiring 900 new pilots and 4200 cabin crew in the coming year. The company’s market share has also increased over the past few months.
देशातील सर्वात जुनी विमान कंपनी अशी ओळख असलेल्या एअर इंडिया कंपनीने आगामी काळात कर्मचारी भरतीची मोठी मोहीम हाती घेतल्याची माहिती आहे. यानुसार आगामी काही महिन्यांत प्रत्येक महिन्याला कंपनी नवीन ५०० कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे समजते. येत्या वर्षभरात ९०० नवे वैमानिक तर ४२०० केबिन कर्मचारी भरण्याची प्रक्रिया कंपनीने यापूर्वीच सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या मार्केट हिस्सेदारीत देखील वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने विस्ताराची मोठी योजना हाती घेतली असून नव्या ४७० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या खेरीज देशात नव्याने विकसित होणाऱ्या नव्या विमानतळांवर देखील कंपनीच्या सेवा सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने कर्मचारी भरतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे.
ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कंपनी अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणालीदेखील विकसित करत असल्याचे समजते. ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांच्या बुकिंगची व्यवस्था किंवा एखादे वेळी विमान रद्द झाले तर त्वरित दुसऱ्या विमानाचे बुकिंग करणे आदी बाबी वेगाने करता येतील.
AIR India Bharti 2023: AIR India has going to recruit vacant various vacant posts of “Cabin Service Trainer”. There are a total of 40 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 10th of May 2023. The official website of AIR India is airindia.in. More details are as follows:-
AIR इंडिया अंतर्गत “केबिन सेवा प्रशिक्षक” पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे./ उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – केबिन सेवा प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.airindia.in
AIR India Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
केबिन सेवा प्रशिक्षक | 40 पदे |
Educational Qualification For AIR India Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
केबिन सेवा प्रशिक्षक | Eligibility Criteria:
Desired Competencies:
|
How to Apply For AIR India Jobs 2023
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
- तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For AIR India Mumbai Bharti 2023 | www.airindia.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/acHX8 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/lyRZ6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.airindia.in |
Air India Recruitment 2023: Big opportunity for engineers!! Earlier 3,800 jobs have been initialized by Air India in 6 months! Now re-hiring for thousands of posts will start soon in Air India. Candidates who are engineer Graduates can check this New Air India Bharti 2023 Update.
टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. यात वरिष्ठ वैमानिकांसह प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही समावेश असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाने बोइंग आणि एअरबस या विमान निर्मिती कंपन्यांना ४७० विमानांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिलेली आहे. यात मोठ्या आकारांच्या विमानांचाही समावेश आहे. सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नव्या विमानांसाठी कंपनीला वैमानिकांची गरज लागणार आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात ५०० पेक्षा अधिक विमाने सहभागी होत आहेत. त्यामुळे कंपनी एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची भरती करीत आहे. ए ३२०, बी ७७७, बी ७८७ व बी ७३७ या विमानांचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश हाेणार आहे. कॅप्टन व प्रथम अधिकाऱ्यांसाेबतच प्रशिक्षकांचीही भरती करण्यात येईल.
टाटा समूहाच्या या कंपनीनं बोईंग आणि एअरबससह 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरबसला दिलेल्या ऑर्डरमध्ये 210 A320/321 Neo/XLR आणि 40 A350-900/1000 चा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं बोइंगला 190 737-मॅक्स, 20 787 आणि 10 777 ची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ताफ्यात 500 हून अधिक विमानांचा समावेश होणार आहे. यामुळे ते आपल्या A320, B777, B787 आणि B737 च्या ताफ्यासाठी कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर आणि ट्रेनर्सची भरती करत आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
वादादरम्यान भरती – एअर इंडिया अशा वेळी वैमानिकांची भरती करत आहे जेव्हा त्यांच्या विद्यमान वैमानिकांनी सॅलरी स्ट्रक्चर आणि सेवा शर्तींबाबत कंपनीच्या अलीकडील निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियानं 17 एप्रिल रोजी पायलट आणि केबिन क्रूसाठी नवीन सॅलरी स्ट्रक्चर सादर केलं. इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट गिल्ड (IPG) या दोन पायलट युनियननं त्यास नकार दिला आहे. ते कामगार कायद्यांचं उल्लंघन करतं आणि तयार करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला गेला नसल्याचं युनियनचा आरोप आहे. एअर इंडियाच्या 1500 हून अधिक वैमानिकांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिलं आहे.
टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान पुन्हा आल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी करण्यावर टाटा समूहाकडून भर दिला जात आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर बुक केल्यानंतर आता एअर इंडियामध्ये हजारो पदांसाठी पुन्हा मोठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या ६ महिन्यात सुमारे ३ हजार ८०० जणांना नोकरी दिल्यानंतर आता पुन्हा एअर इंडियाकडून विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात इंजिनिअर्सना संधी असल्याचे म्हटले जात आहे. पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला ६ हजार ५०० पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून, लवकरच एअर इंडियामध्ये पुन्हा भरती सुरू होणार आहे.
सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती टाटा उद्योगसमूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत मागील सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अशातच आता कंपनीकडून विविध पदासांठीची मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एअर इंडियामध्ये ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एअर इंडियाकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
मागील अपडेट्स आणि जाहिराती
After the merger of ‘Air India’ and ‘Vistara’ as well as ‘Air India Express’ and ‘AirAsia India’, the Air India Group needs thousands of pilots for its expanding fleet. According to some reports, the company is said to need more than 6500 pilots, engineers & crew members. This AIR India Bharti 2023 will begin soon.
एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत, मागील सहा महिन्यांमध्ये तीन हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली आहेत, अशी माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली. तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी टाटा उद्योगसमूहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ताब्यात घेतली. कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याशिवाय, सध्याच्या विमानांचे नूतनीकरण करण्यासाठी ४० कोटींची गुंतवणूक करण्यासाठीही कंपनी वचनबद्ध आहे. कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे.
एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. प्रारंभीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले.
एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.
टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.
भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण
भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
मनुष्यबळाची गरज का?
‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला ६५०० हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.
जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट कटींग केले जात आहे. त्याचवेळी एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट (Pilot) आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही जागांसाठी तब्बल दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. एअर इंडिया B777 विमानासाठी पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी वार्षिक दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. अनुभवी पायलटेसाठी ही चांगली संधी असणार आहे. या संदर्भातील पुढील अपडेट्स आंही जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर अपडेट्स करू. पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Table of Contents