नोकरीसाठी सुवर्णसंधी; AICTE कडून प्लेसमेंट संकेतस्थळाची निर्मिती!
AICTE Internship 2023
AICTE Internship 2023
AICTE Internship 2023 Registration – The All India Council for Technical Education (AICTE) has launched a separate placement website to provide jobs and Internship to students of technical education colleges in rural and tribal areas of the country. Government and private companies have registered on this website and students will be able to get information about jobs in companies from home.
देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्वतंत्र प्लेसमेंट संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर सरकारी, खासगी कंपन्यांनी नोंदणी केली असून, कंपन्यांतील नोकऱ्यांची विद्यार्थ्यांना घरबसल्या माहिती मिळू शकणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतल्याची माहिती एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी जूनमध्ये पुण्यात दिली होती. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन यांनी या संकेतस्थळाचे अनावरण केले. हे संकेतस्थळ आता एआयसीटीईच्या इंटर्नशीप संकेतस्थळाशीही जोडण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
डॉ. सीतारामन म्हणाले, की या संकेतस्थळाद्वारे ग्रामीण आणि आदिवासी भागातील अभियांत्रिकीसह अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भटकावे लागणार नाही. या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थी थेट हजारो बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडले जातील. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित नोकरीचे हजारो पर्याय उपलब्ध होतील. आतापर्यंत चार हजारहून अधिक कंपन्यांनी नोंदणीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे कंपन्यांना देशभरातील उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांतील उत्तम मनुष्यबळाचा शोध घेण्याचा सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी अनुकुल अशा पद्धतीने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटची गरज भासणार नाही. नोकरी मिळण्यासह करिअर समुपदेशन, मुलाखतीसाठी मार्गदर्शन अशा सुविधाही संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
AICTE Important Notice : The All India Council for Technical Education has issued an important notification for universities conducting open and distance learning programs and online programs. Detailed information is given on the official website.
ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे ओपन आणि डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आणि ऑनलाईन प्रोग्राम आयोजित करणाऱ्या विद्यापीठांसाठी एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एआयसीटीईने जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, ज्या खासगी विद्यापीठांनी केंद्र किंवा राज्यातील ओडीएल/ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी यूजीसीकडे अर्ज केले आहेत आणि त्यांना एआयसीटीईकडून एनओसी मिळवायची आहे, त्यांना एआयसीटीई वेब पोर्टलवर लॉगिन क्रेडेंशियल मिळवावे लागेल. एनओसीसाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी लॉगिन क्रेडेंशियल एआयसीटीई वेब पोर्टलवर उपलब्ध असेल. विद्यापीठाच्या पोर्टलवर लॉगिन करून संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.
NTA ने हे नोटिफिकेशन मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लीकेशन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स, लॉजिस्टिक अॅण्ड टुरिझम यासाठी जाहीर केले आहे. त्याचवेळी, शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी हे अभ्यासक्रम आयोजित करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यापीठांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली तर त्यांनी एआयसीटीईच्या केंद्रीय तक्रार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत नोटीसवर लिंक उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, विद्यापीठे AICTE च्या हेल्पडेस्क क्रमांकावर देखील फोन करू शकतात. तसेच ०११२९५८१३३३ /०११२९५८१३३८/०११२९५८१३४२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत (सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
AICTE had recently announced a revised academic calendar. Accordingly, the last date for commencement of classes for first year students of technical courses is October 25. Lateral entry in the second year. The last date for new registration is October 30. In addition, the last date for admission in PGDM or PGCM institutes recognized by the university or board is 31st August.
अधिकृत वेबसाईट – www.aicte-india.org