कर्मचाऱ्यांची भरती बंद; काम दिले ‘AI’ कडे! – “AI” – Jobs in RISK
स्वीडनची फिनटेक कंपनी ‘क्लार्ना’ने कर्मचारी भरती बंद करून बहुतांश कामे कृत्रिम बुद्धिमत्तेकडून (एआय) करून घेणे सुरू केले आहे. ‘क्लार्ना’ ही कंपनी ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ (बाय नाऊ, पे लॅटर) या योजनेसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचे सीईओ सेबास्टिअन सिमियान्टकोव्हस्की यांनी सांगितले की, कर्मचान्यांची जवळपास सगळी कामे एआय करीत आहे. या मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर अनेक क्षेत्रात काय होईल याची चिंता अनेकांच्या सतावत आहे. या AI मुळे बेरोजगारी वाढेल काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नक्की काय होणार हे तर पुढील परिस्थितीच सांगेल!
त्यामुळे कंपनीने मागील १ वर्षापासून कर्मचारी भरती बंद केली आहे. एक वर्षापूर्वी कंपनीकडे ४५०० कर्मचारी होते. त्यांची संख्या आता घटून ३५०० झाली आहे. कर्मचारी भरण्याऐवजी कंपनीने ऑटोमेशनकडे लक्ष केंद्रित केले आहे. अन्य तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे आमच्याकडेही लोक ५ वर्षे थांबतात. दरवर्षी २० टक्के कर्मचारी कंपनी सोडतात. नवीन भरती थांबल्यामुळे कर्मचारी संख्या कमी होत आहे. कर्मचारी भरती बंद करून सर्व कामे एआयवर सोपविली जातील, अशी भीती अनेक जाणकारांनी वर्तविली होती.