अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रोजेक्ट्सचा नवीन टप्पा, 2000 उमेदवारांना मिळणार नोकर्‍या !- Ahilyanagar’s Industrial Boom,2000 Jobs!

Ahilyanagar’s Industrial Boom,2000 Jobs!

शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून देशातच संरक्षण सामग्री तयार करण्यासाठी शेल फोर्जिंग प्रकल्प सुरू होत आहे. या मोठ्या उद्योगामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Ahilyanagar’s Industrial Boom,2000 Jobs!

शिर्डीत 4500 कोटींचा मोठा प्रकल्प!
सावळीविहीर खुर्द, शिर्डी औद्योगिक वसाहत येथे गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड (शेल फोर्जिंग प्रकल्प) च्या भूमिपूजन समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये:

  • 35 लाख चौरस मीटर क्षेत्रावर उभारणी
  • पुढील 5 वर्षांत 6 लाख बॉम्ब शेल्सची निर्मिती
  • 4500 कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी पूर्ण
  • 2000 युवकांना मिळणार रोजगाराची संधी

शिर्डीच्या औद्योगिक विकासाला गती
मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू होत आहे, तसेच औद्योगिक वसाहतीसाठी ५०० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. टाटा कंपनीच्या पुढाकाराने २५० कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्रही सुरू होणार आहे.

कोपरगावच्या विकासासाठीही पावले उचलली जात आहेत
आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या औद्योगिक वाढीसाठी वळू प्रकल्पाची जागा औद्योगिकीकरणासाठी मिळावी, अशी मागणी केली.

भविष्यात आणखी प्रकल्प येणार!
प्रकल्पाचे चेअरमन गणेश निबे यांनी सांगितले की, लवकरच दोन नवीन प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. मंत्री विखे पाटील यांच्या सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे जिल्ह्याला औद्योगिक गती मिळणार असून, शेतकरी आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड