TCS राबविणार भर्ती! अहिल्यानगर महापालिकेत शेकडो पदे रिक्त, नवीन पदभरती आता…! | Ahilya Nagar Mahanagarpalika Bharti 2025

AMC Recruitment 2025 Apply Now

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2025

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत एक मोठा विरोधाभास पाहायला मिळत आहे. एका बाजूला यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी झगडत असताना, जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मात्र उमेदवारांची टंचाई भासू लागली आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही 50 टक्के जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांत पात्र उमेदवार मिळाले नाहीत किंवा ज्या त्या प्रवर्गातील उमेदवारच उपलब्ध नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्यापही 449 पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. अधिकारी, कर्मचारी यांचा तुटवडा असल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त असून त्याचा परिणाम सरकारी सेवांवर होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या नोकरभरतीसाठी जिल्हा परिषदेने तब्बल 19 संवर्गांमधील 937 पदांसाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अद्यापही सर्व पदे भरता आलेली नाहीत. या भरतीसाठी आयबीपीएस (IBPS) या कंपनीकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. ऑक्टोबर 2023 मध्ये काही संवर्गांची परीक्षा पार पडली, तर काही संवर्गांच्या परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात आल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांची निवड करण्यात आली. ऑगस्ट 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील 43 उमेदवारांना निवडपत्र देण्यात आले, ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा आचारसंहितेपूर्वी 285 आरोग्य सेवक (महिला) उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली अजूनही 449 जागा रिक्त असून यातील 230 उमेदवार विविध कारणांमुळे सापडले नाहीत.

ही भरती प्रक्रिया एवढी रखडण्यामागे मुख्यतः शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणासंबंधी काही तांत्रिक समस्या असल्याचे दिसून येते. काही संवर्गांमध्ये आवश्यक त्या प्रवर्गाचे उमेदवारच मिळाले नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवार असूनही त्यांची शैक्षणिक पात्रता अपुरी आहे. आरोग्य सेवक (महिला) या संवर्गातील 496 पदांपैकी फक्त 284 उमेदवारांची निवड झाली उर्वरित 211 पदांसाठी उमेदवारच उपलब्ध नाहीत 75 जागा माजी सैनिकांसाठी राखीव होत्या, मात्र त्याठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. 136 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार उपलब्ध नाहीत. पशुधन पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातही अशीच स्थिती आहे.

याशिवाय, आरोग्य सेवक (पुरुष – हंगामी फवारणी क्षेत्र) या संवर्गातील 187 जागांवरील भरती न्यायप्रविष्ट असल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील ही नोकरभरती रखडल्याने प्रशासनावर मोठा ताण पडला आहे. विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे अनेक विभागांत कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची गरज भासत आहे.

 


 

 

प्राप्त माहिती नुसार अहिल्यनगर महानगर पलिकेतील भर्ती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येण्याचे चिन्हे आहेत।  साध्य मात्र ही महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया रखडली आहे. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने १३० पदांना खात्री लावत केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रस्ताव पुन्हा नाशिकला पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी आलेली नसल्याने तांत्रिक पदांची भरती पुन्हा एकदा रखडली आहे. महापालिकेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे. 

त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महानगरपालिकेने १३४ तांत्रिक पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. पगाराचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढल्याने महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव तयार करून पुन्हा नाशिक येथे पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी आलेली नसल्याने ही प्रक्रिया सध्या रखडली आहे.

भरतीसाठी मंजूर झालेली ४५ पदे

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ३
  • कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) – १
  • अभियांत्रिकी सहाय्यक – ८
  • विद्युत पर्यवेक्षक – ३
  • लिपीक टंकलेखक – १३
  • संगणक प्रोग्रॅमर – १
  • पशुधन पर्यवेक्षक – १

नाशिकहून मंजुरी आल्यानंतर भरती प्रक्रियेबाबत टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे भरती प्रक्रियेसाठी प्रस्ताव केला जाणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता सध्या दिसत आहे.  शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम, आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढला. त्यामुळे निर्माण झालेली तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीची गरज असलेली ४५ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 


महापालिकेत १३४ पदांसाठी सरळसेवा भरतीला शासनाने मान्यता दिली. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर विभागातील पुरेशा मनुष्यबळाअभावी नागरी सुविधा आणि दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. मनपाच्या आकृतिबंधात २ हजार ७८० पदे मंजूर आहेत. गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले. सध्या मनात कायमस्वरुपचे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे मंजूर पदापेक्षा अर्धेच कर्मचाऱ्यांवर सध्या मनपाचे कामकाज सुरू आहे. शासनाने १३४ पदांच्या भरतीला मान्यता दिल्यानंतर भरती पक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीसोबत करार केला, तसेच कंपनीला आवश्यक असलेली सर्व माहिती मनपाने कंपनीला दिली. मात्र, कंपनीकडून परीक्षेचे अंतिम शेड्यूल तयार होत नसल्याने भरती प्रक्रिया पुढे सरकत नाही. 

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. तांत्रिक पदांची होणार भरती स्त्रीरोगतज्जा १. भूजलतजा १. पर्यावरण संवर्धन अधिकारी १. कनिष्ठ अभियंता २, अभियांत्रिकी सहायक ८, आरेखक १, संगणक प्रोग्रॅमर १. विद्युत पर्यवेक्षक ३. पाणी लॅब टेक्निशियन ६, लॅब टेक्निशियन १, लॅब असिस्टंट ६. प्रदूषण नियंत्रण अधिकारी १. पशुधन पर्यवेक्षक १. लघु टेकलेखक २, कनिष्ठ विधी अधिकारी २. समाजविकास अधिकारी १, सॅनिटरी सबङ्गन्स्पेक्टर १२, फायरमन १, लिपिक, टंकलेखक, बस ऑफिसर १. ऑपरेटर २०, फायरमन ५० लिपिक, टंकलेखक १३

 

Previous Updates


Ahmednagar Mahanagarpalika Bharti : Ahmednagar Mahanagarpalika has published the notification for the Post of “Veterinary Doctor”. There is a 01 vacant post available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given address before the last date. The last date of Submission of application is 20th of August 2024. For more details about Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत “व्हेटर्नरी डॉक्टर” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

 

  • पदाचे नावव्हेटर्नरी डॉक्टर
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://amc.gov.in/

Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
व्हेटर्नरी डॉक्टर 01

Educational Qualification For Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्हेटर्नरी डॉक्टर B.V.S.C&AH व तत्सम कौंसिलकडे नोंदणी

Salary Details For Ahmednagar Mahanagarpalika Notification 

पदाचे नाव वेतनश्रेणी
व्हेटर्नरी डॉक्टर ५०,०००/-

How To Apply For Ahmednagar Mahanagarpalika Application 

  • वरील पदाकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For amc.gov.in Notification 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/QfV3f
✅ अधिकृत वेबसाईट
https://amc.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Latest Updates & Details are available

  2. MahaBharti says

    Recruitment of 134 Posts, Contract with TCSL Company

  3. MahaBharti says

    Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Details added above..

  4. MahaBharti says

    Latest Recruitment

  5. Amruta says

    Indian Army ke form kab ayenge

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड