खुशखबर! अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्ज सुरु, पूर्ण माहिती बघा ! – Agniveer Recruitment 2025 !
Agniveer Recruitment 2025 !
जर आपल्याला लष्करात भरती व्ह्यच असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या, भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 दरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. यंदाच्या भरतीत अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलीस या विविध पदांसाठी भरती होणार आहे. याशिवाय हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर, JCO कॅटरिंग आणि JCO रिलिजियस टीचर पदांसाठीही संधी उपलब्ध आहे. चाल तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया!!
यंदाच्या भरती प्रक्रियेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता उमेदवारांना एका अर्जात दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि अधिक उमेदवारांना संधी मिळेल. अर्ज शुल्क 250 रुपये असून, ते ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज करताना उमेदवारांनी 10वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे पालकांची माहिती भरावी आणि डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीच्या नियमांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यंदा 1600 मीटर धावण्याचे 2 गटांऐवजी 4 गट करण्यात आले आहेत, ज्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे. 5 मिनिटे 30 सेकंदात धाव पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना 60 गुण, तर 6 मिनिटे 15 सेकंदात धाव पूर्ण करणाऱ्यांना 24 गुण दिले जातील. उंची आणि छातीचे निकष पदानुसार निश्चित करण्यात आले आहेत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार भिन्न आहे. अग्निवीर जनरल ड्युटीसाठी 10वी उत्तीर्ण आणि 45% गुण, तर टेक्निकल पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि 50% गुण अनिवार्य आहेत. याशिवाय, अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास), महिला लष्करी पोलीस आणि क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल पदांसाठी ठरावीक शैक्षणिक निकष आहेत. लिखित परीक्षा जून महिन्यात अपेक्षित असून, अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
अर्ज प्रक्रियेसंबंधी कोणताही प्रश्न असल्यास 7518900195 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, अधिकृत संकेतस्थळावर संगणक आधारित परीक्षेचा सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल. भारतीय लष्करात भरती होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी ही संधी साधावी आणि लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.