परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे ! | FS Maharashtra Online Apply
Abroad Scholarship Application
FS Maharashtra Online Apply
Abroad Scholarship Application : अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
योजनेच्या अटी व शर्ती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील पटकातील असावा
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखांपेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तशी कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.) परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील, शिष्यवृत्ती याक्याच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलीचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवतेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील.
- एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही, यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.
- पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उतीर्ण केलेला असावा.
- परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी, शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषा मध्ये समानता आणण्याकरीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि. ३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२३.११.२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील.
- शासन पुरकपत्र क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.६.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील.
- शासन निर्णय क्र. सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि. २५.७.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील.
- शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२१.०८.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील.
- अल्पसंख्यांक शासन शुध्दीपत्रक क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.०९.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील.
सदरील वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ३१/१२/ २०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ऑनलाईन भरुन त्यांची प्रिंट, समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करावा, महाराष्ट्र शासनाची वेबसाईट https://fs-maharashtra.gov. in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी. तसेच अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
योजनेतील लाभाचे स्वरुप
- परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्याध्वनि प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मयदित मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.
- विद्याथ्यांस खालील बार्बीवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु. एस. ए. व इतर देशांसाठी (यु.के. बगळून) १५०० यु. एस. डॉलर आणि यु.के. साठी १,१०० जी.बी.पी. इतका निर्वाह भत्ता / इतर खर्च / आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :- ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१/१२/२०२४ असेल. वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत. इतर आवश्यक बाबी- १. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अपूर्ण भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. २. अर्जासोबत आवश्यक असलेली स्वसाक्षांकित कागदपत्रे न जोडल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्जावर स्वसाक्षांकित फोटो नसलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ३. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ४. अल्पसंख्यांक विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रवर्गा व्यतिरिक्त इतर प्रवर्गाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यांनी सबंधीत कार्यालयाकडे परस्पर अर्ज करावेत. ५. QS World University Kanking २०० च्या आतील विद्यापीठाशिवाय इतर परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ६. प्रचलित अटी व शर्तीनुसार अपात्र ठरल्यास त्यांना स्वतंत्र पत्रव्यवहार करुन कळविले जाणार नाही. ७. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या अधिकृत पत्यावर कळविले जाईल जर विहीत कालावधीत त्यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण न केल्यास त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. ८. परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे अंतिम अधिकार शासनास असतील.
Download FS Minority Scholarship Exam PDF
महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, नियोजन, उच्च व तंत्र शिक्षण, या विभागांमार्फत स्वतंत्रपणे परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता येण्याच्या उद्देशाने या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. आता 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयापूर्वी बार्टी (प्राप्त अर्ज 763), सारथी (प्राप्त अर्ज 1329), महाज्योती (प्राप्त अर्ज 1453) या संस्थांमार्फत देण्यात आलेल्या अधिछात्रवृत्ती जाहिरातींनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण 3545 संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना 50 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेली मर्यादा 200 वरून 300 इतकी करण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेली मर्यादा 100वरून 200 इतकी करण्यात आली आहे. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 55 टक्के गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55 टक्के गुणांसहीत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी संबंधित यंत्रणेने थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करावयाची आहे.
Attention!!! Check User Guide Before filling up the application || Online forms for the Foreign Scholarship are open from 18th July to 9th August. Apply now!
Abroad Scholarship Application: उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १८ जुलैपासून सुरू झाली असून ता. ९ ऑगस्ट ही अंतिम तारीख असल्याची माहिती विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. उमेश नागदेवे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे राज्यभरातून केवळ ४० जणांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शिक्षण संस्था वर्ल्ड रैंकिंग २०० च्या आत असली पाहिजे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असायला हवे. ९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर १२ तारखेपर्यंत अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे, झेरॉक्स प्रतिसह त्या-त्या विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखेतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण येथे, तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र अंतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक तंत्रशिक्षण येथे कागदपत्रे जमा करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
वयोमर्यादा :-
दिनांक १ जुलै २०२४ रोजी उमेदवारांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
उत्पन्न मर्यादा :-
१. शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०२०/प्रक्र.११६/तांशि-४, दिनांक ६ सप्टेंबर, २०२१ नुसार या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याच्या व त्याच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लाख इतकी करण्यांत आलेली आहे.
२. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे (वर्ष २०२३-२४) कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
३. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदारपेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
शैक्षणिक अर्हता :-
१. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंमान ६०% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
२. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंमान ६०% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
३. शासन शुध्दीपत्रक दि. ३०-१०-२०१८ नुसार परदेशातील विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ही अर्हता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पीएच.डी. साठीचा अभ्यासक्रम हा बदलत्या काळातील विशेष संशोधन व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असल्यास असे उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात.
४. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी हा अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.
अभ्यासक्रमाचा कालावधी :-
१. पीएचडी-४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा जो कमी असेल तो
२. पदव्युत्तर पदवी-२ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो
३. पदव्युत्तर पदविका १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो
Download FS Maharashtra Application Manual PDF
66 शिष्यवृत्तीमध्ये समावेश असतो. गतवर्षी मराठवाड्यातून परदेशी शिष्यवृत्तीसाठी आठ अर्ज आले होते. त्यापैकी सहा जणांना शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्तीच्या जागांपैकी ३० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येते.
डॉ. उमेश नागदेवे, विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग.
Foreign Scholarship Exam – Selection List
Abroad Scholarship Application : Department of Social Welfare has been declared the Foreign Scholarship Examination Selection List. With the announcement of the selection list, the students will be able to take advantage of this scholarship to study for the planned postgraduate degree, Ph.D. Further details are as follows:-
समाजकल्याण विभागाने अखेर छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षणासाठीचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उशिरा का होईना निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नियोजित पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे.
- ‘तत्काळ निवड यादी प्रसिद्धी करावी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
- त्यानंतर समाजकल्याण विभागाने तातडीने हालचाल करत निवडयादी जाहीर केली आहे.
- विभागाकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती दिली जाते.
- यंदा या शिष्यवृत्तीची निवडयादी ३० ते ३५ दिवस उशिराने जाहीर झाली आहे.
- अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला पोचण्यास उशीर होणार आहे.
- त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच आहे.
- आता विद्यार्थ्यांना व्हिसा, विमानप्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
- तसेच किमान निवडयादी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- समाजकल्याण विभागाने पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.चे परदेशात शिक्षणासाठी राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
- या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली जाते.
शिष्यवृत्ती मिळाली तरी प्रश्न लगेच संपत नाही. संबंधित देशात गेल्यानंतर राहण्याचा-खाण्याचा खर्च करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला हा खर्च परवडणारा नसतो. गेल्यावर्षी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिष्यवृत्ती मिळण्यापूर्वी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होती. यंदा मात्र ती बंद आहे. त्यामुळे विद्यमान मंत्र्यांनी याबाबत विचार करावा.
– राजीव खोब्रागडे, द प्लॅटफॉर्म विद्यार्थी संघटना
Scholarship to Study Abroad
Abroad Scholarship Application : The last date for govt scholarship to study abroad is extended till 20th July 2022. Interested and eligible candidates apply till 20th July 2022. Further details are as follows:-
महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विजाभन विभागाकडून दिनांक २३ मे २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २३ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते.
- परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विजाभन विभागाकडून दिनांक २३ मे २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २३ जून २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते.
- आता हे अर्ज सादर करण्याची मुदत आता दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
- मागास बहुजन कल्याण विभागाने असे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
- परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शासनाने अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
- त्यानुसार, या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- उमेदवार किंवा उमेदवाराचे आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक, तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
Abroad Scholarship – Eligibility Criteria
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यावत सन ०२२ मधील द टाइम्स हायर एज्युकेशन किंवा QS Qualcquarelli Symonds रँकिंग २००च्या आत असणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराच्या पालकांचे किंवा कटुंबाचे आणि उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून जास्त नसावे. दिनांक १ जुलै रोजी उमेदवाराचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शासनाने अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
- त्यानुसार, या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यु्त्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अशी या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
- त्याच प्रमाणे पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती!! अर्जांसाठी 20 जुलैपर्यंत मुदतवाढ – Scholarship Application Extension
Abroad Scholarship Application : Scholarship Department Of Higher And Technical Education Gives The extension till 22nd of July 2022 for Abroad Scholarship Applications. Interested and eligible candidates before 22nd of July 2022 through http://www.dtemaharashtra.gov.in. Further details are as follows:-
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी आठ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आता २२ जुलैपर्यंत http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
- राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
- परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.
- राज्यातील खुल्या प्रवर्गातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
- त्यासाठी आठ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.
- आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहसंचालकांकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे.
संबंधित शिष्यवृत्ती ही ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ किंवा ‘क्यू एस रँकिंग’मध्ये समाविष्ट असलेली महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळू शकणार आहे. इतर कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू होणार नाही, असेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
About Abroad Scholarship
- १. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार.
- २. पदवी, पदव्युत्तर, पीएचडी शिक्षणासाठी अर्ज करता येणे शक्य.
- ३. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत हवे.
- ४. ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ किंवा ‘क्यू एस रँकिंग’मध्ये समाविष्ट महाविद्यालये व विद्यापीठांमध्येच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
- ५. राज्यातील एकूण २० विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती.
How to Apply For Abroad Scholorship 2022
- उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- २२ जुलैपर्यंत अर्ज भरून त्याची छायांकित प्रत सर्व आवश्यक कागदपत्रांसह विभागाच्या सहसंचालकांना सादर करणे बंधनकारक असणार आहे.
अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in
Foreign Scholarship For Eligible Candidates
Abroad Scholarship Application : The Foreign Scholarship for the meritorious students in the open category in the state of Maharashtra. The Scholarship is organized for the postgraduate, postgraduate and PhD courses. Interested and eligible candidates apply online at https://foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in. A copy of the application filled online, original certificates / documents along with their attested copies should be submitted to the concerned Divisional Office for verification as per the following schedule. Further details are as follows:-
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education) किंवा Qs (Quacquarelli Symonds) Ranking 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अशा विद्याथ्यांकरिता शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२१८/तांशि-४, दि. ०४.१०.२०१८, क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.११६/ तांशि-४ दिनांक ०६ सप्टेंबर, २०२१ व शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२७४ (भाग-२)/तांशि-४ दिनांक २२ मार्च, २०२२ व शासन पत्र क्रमांक पशियो-२०२२/प्र.क्र.१०८/तांशि-४, दि. ३ जून, २०२२ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे शाखा/ अभ्यासक्रम निहाय जागा उपलब्ध असतील.
सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
- उमेदवार व उमेदवाराचे आई/वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.
- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्ययावत (सन २०२२ मधील) THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 200 च्या आत असणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराच्या पालकांचे/कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील (२०२१-२२ मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
- या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती इत्यादी माहिती करिता तंत्र शिक्षण संचालनालयाच्या https://foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२१८/तांशि-४, दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१८ व शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र. ११६/तांशि-४, दिनांक६ सप्टेंबर, २०२१ चा शासन निर्णय तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. २१८/तांशि-४, दिनांक ३० ऑक्टोबर, २०१८ व दिनांक ११ फेब्रुवारी, २०१९ ची शासन शुद्धिपत्रके पहावीत व त्याअनुषंगाने अर्जाची छाननी करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी https://foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर online पद्धतीने अर्ज भरावा व online भरलेल्या अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रतींसह पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात खालील वेळापत्रकानुसार सादर करावीत.
या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links | foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in
|
|
? पूर्ण जाहिरात |
https://bit.ly/3aEnBnW |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3aEnBnW |
Abroad Scholarship For OBC SBC VJNT Students
Abroad Scholarship Application : The scholarship is provided by the Other backward Bahujan Welfare Directorate to interested students. Abroad Scholarship For Obc Sbc Vjnt Students By Maharashtra Government Apply Till June 23. For more details about the scholarship like, Application form, Govt. Decision and detailed information, visit www.maharashtra.gov.in. Furter details are as follows:-
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती!! त्वरित अर्ज करा
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे दर वर्षी परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. संचालनालयातर्फे या शिष्यवृत्तीसाठी कोणकोणत्या अटी आहेत, ते जाणून घ्या.
- भटक्या आणि विमुक्त जमाती (VJNT), इतर मागास वर्ग (OBC) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
- या प्रवर्गातील इच्छूक विद्यार्थ्यांनी २३ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केले आहे.
- इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे दर वर्षी परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
- शिष्यवृत्तीसाठी संचालनालयातर्फे ठरवण्यात आलेल्या अटींची पूर्तता केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती प्राप्त होते.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकाच्या आतील असावी, शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल, अशा अटींचा समावेश आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जाचा नमूना, शासन निर्णय व सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज ‘संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे- १’ यांच्याकडे २३ जून २०२२, सायंकाळी ६.१५पर्यंत सादर करता येणार आहे.
अशी असेल शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तींतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम मिळणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता, परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येतानाचा विमान खर्च विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे मिळणार आहे.
Foreign Scholarships Application
Abroad Scholarship Application : Foreign Scholarships for Students in the Fiscal Year 2022-2023 !! Other Backward Classes Bahujan Welfare Department provides scholarships to students in the categories of Vijabhaj, Imav and Vimapra to study abroad. In the financial year 2022-23, applications are being invited from students till 23rd June 2022 for a foreign scholarships. Further details are as follows:-
2022-2023 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती!! त्वरित अर्ज करा
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी. ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, ११ ऑक्टोबर २०१८ नुसार हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे २३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.
योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे.
- विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.
- विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.
- विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.
Scholarship for Indian students
Abroad Scholarship Application: Scholarships are being offered to Indian students by the Israeli government. Eligibility criteria must be met for this. Interested and eligible candidates can apply till December 30, 2021. Details are given on the official website. Further details are as follows:-
इस्त्रायल सरकारतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत आहे. यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
इस्रायल सरकारतर्फे भारतीय विद्यार्थ्यांसाठी तीन प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत. आहे. याअंतर्गत शैक्षणिक वर्ष शिष्यवृत्ती (Academic Year Scholarships), आंशिक शैक्षणिक वर्ष शिष्यवृत्ती (Partial Academic Year Scholarships)आणि उन्हाळी भाषा अभ्यासक्रमासाठी (Summer Language Courses Scholarships) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला असून बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इस्त्रायली विद्यापीठाचे शैक्षणिक निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Eligibility Criteria For Summer Language Courses Scholarships | Academic Year Scholarships
- इस्त्रायल सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बीए किंवा बीएससी पदवी आणि चांगली शैक्षणिक कामगिरीची असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- इस्रायली नागरिक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकत नाही.
- तसेच विद्यार्थ्यांकडे इंग्रजी किंवा हिब्रू भाषेतील प्राविण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- संस्थेमार्फत अर्ज स्वीकारल्यानंतरच उमेदवारांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- इस्त्रायली दूतावासाने जाहीर केलेला विद्यार्थी व्हिसा असणे आवश्यक आहे.
- स्थानिक इस्रायली दूतावासाशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया आणि शिष्यवृत्तीसंबंधी अधिक माहिती मिळविता येणार आहे.
Important Documents For Partial Academic Year Scholorship
- उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे भरला जाईल याची खात्री करा.
- अर्ज अपूर्ण असल्यास बाद ठरविला जाईल.
- इस्त्राईलमधील ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसेच ज्या विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल त्याचा सविस्तर तपशील भरा.
- तुमचा रेझ्युमे आणि इस्रायली विद्यापीठांसह पत्रांची देवाणघेवाण केलेल्या प्रती सोबत जोडा.
- यासोबतच शिफारसीची किमान दोन पत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, हेल्थ सर्टिफिकेट सोबत जोडा.
Important Dates For Israel Government Scholorship
Students applying for this scholarship will have to attach important documents with the application. It is also necessary to meet the eligibility criteria given by the candidates. Interested candidates can apply before December 30, 2021.
Abroad Scholarship Application
Abroad Scholarship Application : Scholarships are offered by the Department of Higher and Technical Education to enable meritorious students in the open category to pursue higher studies abroad. Earlier, the deadline for applying for the scholarship was October 18. It has now been increased and students will be able to apply till November one.
Maharashtra Higher Education In Abroad Scholarship Application Date Extended
खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, एक नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, १ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज पडताळणी आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
The number of students going abroad for higher education has increased significantly in the last few years. Against this backdrop, from 2018, the Department of Higher and Technical Education has started scholarships for open category students. Many students are benefiting from this scholarship and now with the extension, some more students will be eligible for the scholarship.
Table of Contents
There is no Link for application in the update. Where to apply? Please add the link.