खुशखबर, महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आशा सेविकांच्या मानधनात वाढ, नवीन GR प्रकाशित! । Asha Swayamsevika Bhatta Increment

aasha swayamsevika Bhatta Increment

Aasha Swayamsevika Bhatta Increment

महाराष्ट्रातील आशा सेविकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आशा सेविकांच्या मानधनात चार हजार रुपयांनी तर गट पर्यवेक्षकांच्या मानधनात सहा हजार २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

(१) “गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

(२) उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

(३) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.१७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.

या अंतर्गत गेल्या तीन महिन्यांचे म्हणजेच ९१ दिवसांचे मानधन एकत्रितपणे दिले जाणार आहे. यासाठी ३२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, २८४.१६ कोटी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नवीन प्रकाशित GR येथे पहा

 

महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा सेविका आणि साडेतीन हजारांहून अधिक गट पर्यवेक्षक कार्यरत आहेत. मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविका व गट पर्यवेक्षकांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संप पुकारला होता. दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांनी कृती समितीची बैठक घेऊन आशा वर्कर्स आणि गट पर्यवेक्षकांना दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तर आशा वर्कर्सच्या मानधनातही वाढ केली होती. यासोबतच संपाच्या काळात काम पूर्ण झाल्यावर मानधन देण्याचेही मान्य करण्यात आले. मात्र, गट पर्यवेक्षकांच्या मानधनात समाधानकारक वाढ न झाल्याने संप लांबणीवर पडला होता. मात्र, सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

वाढीव मानधन
दोन दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाने ठरलेल्या निर्णयानुसार आशा वर्कर्स आणि गट पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन आदेश जारी केला होता. आशा सेविकांच्या मानधनात ६ हजार रुपयांनी, तर गट पर्यवेक्षकांच्या मानधनात ६,२०० रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ३२८.६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यातील २८४.१६ कोटी रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.


Asha Swayamsevika Bhatta Increment

महाराष्ट्रातील ६९ हजार आशांना एक नोव्हेंबर २०२३ पासून दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढ देण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील प्रत्येक आशा सेविकेस थकीत तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम त्वरित मिळावी; अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन पुजारी व अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी केली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

त्यांनी याबाबत १० मे रोजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव व धीरज कुमार राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी १८ ऑक्टोबर २०२३ पासून मार्च २०२४ पर्यंत बेमुदत संप केल्यानंतर दि. १३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व ६९ हजार आशांना दरमहा पाचशे रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय केला. निर्णय होऊन सात महिने होत आले तरीही ही रक्कम आशांना मिळालेली नाही. आशांना मिळणारे मानधन वाढत्या महागाईत अत्यंत अपुरे आहे. म्हणूनच किमान मागील सहा महिन्यांची तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम महाराष्ट्रातील प्रत्येक आशांना त्वरित मिळावी; अन्यथा त्यांना तातडीने तीव्र आंदोलन करावे लागेल. तसेच आशांना पगारवाढ झाल्याने आरोग्य खात्यातील शासकीय अधिकारी आशांना नेमून दिलेल्या कामाशिवाय इतर कामे सांगत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

 


राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता  देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.


aasha swayamsevika Bhatta Increment: Good News For Aasha Swayamsevika !! 7 thousand increase in salary of Asha volunteers. Similarly, Health Minister Tanaji Sawant announced that group promoters will get Rs 6,200 each and Diwali bonus of Rs 2,000 each will be given to Asha and group promoters.  Know More about aasha swayamsevika Bhatta Increment  at below

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ. त्याचप्रमाणे गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ आणि आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले. 

11 गावांत होणार आशांची निवड; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न !

Asha Swayamsevika Mandhan 

Asha Swayamsevika Mandhan 

 

 

 

 

 


गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना महामारी सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करणारा शासन निर्णय आज झाला आहे. मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने घेतली असून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जुलैपासूनच वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे.

आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमित चार कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल दोन हजार रुपयापर्यंत दरमहा वाढ करण्यास करण्यात आली आहे. तसेच गटप्रवर्तक यांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मोबदला वाढल्याने वर्षाला सरासरी 170 कोटी रुपये राज्यासाठी लागणार आहेत. या 170 कोटी रुपयांना ही मान्यता देण्यात आली आहे. 1 जुलैपासून या वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयं सेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला दिला जातो. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण 78 सेवा केल्यास हा मोबदला मिळतो. अशा स्वंय सेविकांच्या मोबदल्यात वाढ करावी यासाठी विविध स्तरावर व विविध ठिकाणाहून मागणी होत होती.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Dnyandeo Machindra Khude says

    Police bhartisathi SC Cast Sathi Age Limit kiti Ahe.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड