आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – वैद्यकीय शिक्षण मंत्री | Aarogya Sevika Bharti 2023

Aarogya Sevika Bharti 2023

Aarogya Sevika Bharti 2023 Update

Aarogya Sevika Bharti 2023 – Recruitment of health workers will get completed in two months said by Medical Education Minister Girish Mahajan during Vidhiadhivesh Question Answer Session. From last 3 years Arogya Sevika Bharti is not carried Out, so it is expected that this recruitment process will start soon. As this is the Year of Recruitment. We can expect this Arogya Sevika Vacancies will be filled. So read more update at below

गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.अस्मिता योजना पुन्हा सुरू करणार

अस्मिता योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून  याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
  • ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात  सॅनिटरी नॅपकीन  उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

Aarogya Sevika Bharti 2023 for 434 vacancies is expected to begin soon. As per the details received from aarogya vibhag Maharashtra, There are tota 434 vacant posts of Aarogya Sevika in region. The recruitment process for this will begin soon. More details are given below.

 

लसीकरणासाठी लसटोचकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र लसीकरण कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ४३४ सहायक आरोग्यसेविकांच्या कायमस्वरूपी पदे मागील तीन वर्षांपासून रिक्त आहेत. लसटोचकांची नियुक्ती केल्यामुळे लसीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल; परंतु प्रत्येक प्रभागात लसीकरणासाठीच्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे, किती बालके जन्माला आली, त्यापैकी कितीजणांचे लसीकरण कोणत्या वेळी आहे, मातांना आरोग्यासंदर्भात कोणते प्रश्न आहेत याचे सर्वेक्षण कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

 

माहितीनुसार, मुंबईतील २०७ युनिटमध्ये एक कोटी ४५ लाख ४८ हजार २६४ लोकसंख्येसाठी एक हजार १५३ केंद्रांची उपलब्धता आहे. यात लसीकरणासाठी ७१९ सहायक परिचारिका आहेत, तर रिक्त जागांची संख्या ४३४ आहे. प्रशासनाकडून प्रत्येक दिवसाला दोन, याप्रमाणे एकूण ४१४ शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पालिकेने निर्धारित केलेल्या निकषांनुसार १० हजार लोकसंख्येसाठी एक सहायक, परिचारिका, तर १० हजार लोकसंख्येसाठी तीन आशासेविका आवश्यक आहेत.

 

मुंबईत करोना व त्यानंतर गोवरसंसर्गाची साथ सर्वाधिक वेगाने पसरलेल्या प्रभागांमध्ये या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या सर्वांत कमी आहे. शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढली आहे, त्या प्रमाणात या पदांच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आलेला नाही. ‘ए’ वॉर्डमधील कुलाबा आरोग्यकेंद्रातील ५३ हजार ७६३ लोकसंख्येसाठी लसीकरण कार्यक्रमातंर्गत चार परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असून, एक पद अद्याप रिक्त आहे. ‘एफ’ दक्षिण या दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या प्रभागात एक लाख तीन हजार ७२० लोकसंख्येसाठी चार परिचारिका असून, तीन जागा रिक्त आहेत. लोकसंख्येनुसार याठिकाणी अतिरिक्त तीन जागांची आवश्यकता आहे. कोब्रा मिठागर आरोग्यकेंद्रामध्ये ७८ हजार ७९२ लोकसंख्येसाठी तीन जागा, तर ट्रान्सिट कॅम्पमधील ८४ हजार ८७ लोकसंख्येसाठी दोन, ‘के’ पूर्व प्रभागातील ‘एमआयडीसी’
प्रभाग

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. reshma Kajania says

    safsafaichi vacancy asel tar sanga

  2. MahaBharti says

    Recruitment Process will start within 2 months

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड