Help Line आरोग्य विभाग परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक!
Aarogy Vibhag Help Line Number
Aarogy Vibhag Help Line Number Group C, Group D Examinations 2021 : राज्यात बराच काल प्रलंबित असणारी (health department) आरोग्य विभागाची पद भरती परीक्षा अखेर आता २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर पसंतीचे केंद्र न मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी युवासेनेचे पदाधिकारी कल्पेश यादव (kalpesh yadav) यांच्याकडे केली होती. त्यानंतर यादव यांनी आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली तसेच आरोग्य विभागाचे सह संचालक डॉ. आर. एस. देशमुख यांनी भेट घेतली. Aarogya Vibhga
यादव म्हणाले, विद्यार्थ्यांची अडचण सोडवणे हे माझं प्रथम प्राधान्य आहे. समाज माध्यमांवर उठणाऱ्या खोट्या अफवांच्या मुळे या परीक्षा रद्द होतात आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. हेच पुन्हा होऊ नये म्हणून मी तातडीने डॉ. पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर डॉ. देशमुख यांची भेट घेतली. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रात अडचणी असतील त्यांच्यासाठी विशेष १० हेल्पलाईन नंबर ( helpline number) आज कार्यान्वित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सुरू असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांक तसेच मेल आयडी वर दोन विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवली असून त्यावर तातडीने कार्यवाही करून अडचण दूर करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवेस बळी न पडता अभ्यास करावा. तसेच काही अडचण असल्यास थेट हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपल्या तक्रारींचे निवारण करावे. असे आवाहन देखील यादव यांनी यावेळी केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Aarogy Vibhag Help Line Number- Click Here
आरोग्य विभाग कागदपत्रे पडताळणी कधी होणार आहेत गट ड मुंबई/ठाणे ज्यांचे काल निकाल लागले आहेत